आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यांतील कार औरंगाबादेत विकणार्‍या माजी आमदाराच्या चालकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उत्तर प्रदेश, बिहार, मुंबईतून चोरलेली वाहने पाच हजार रुपयांच्या कमिशनवर इतर शहरांत विक्री करणार्‍या एका माजी आमदाराच्या माजी चालकाला सिडको पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर काशिनाथ नागुडे (46, रा. वेदांतनगर) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन महागड्या कार जप्त करण्यात आल्या.

उत्तर प्रदेशातील बाबा नावाच्या चोरट्याशी ज्ञानेश्वरची ओळख झाली. बाबा चोरलेली वाहने चालकाच्या मदतीने नाशिक, नागपूरपर्यंत पाठवायचा. वाहन घेऊन जाण्यासाठी तो नागुडेशी संपर्क साधायचा. नागुडे शहरात कार विक्री करत असे. विक्रीच्या रकमेतून पाच हजार रुपये तो काढून घायचा. याची माहिती सिडकोचे निरीक्षक शिवा ठाकरे यांना मिळाली. 9 सप्टेंबरला नागुडे हा इनोव्हा कार (एमएच-21 व्ही 2241) नागपूरकडे जाणार असल्याचे समजताच उपनिरीक्षक शिल्पा लंबे, सहायक फौजदार प्रकाश जेकब, संपत राठोड, पंडित चव्हाण, भीमराव पवार, फकीरचंद फडे, मिलिंद भंडारे, दीपक शिंदे, विनोद परदेशी, शिरीष वाघ यांनी त्याला पकडले. मुंबईतील दिंडोरी पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल आहे. नागुडेकडून पोलिसांनी आणखी एक इनोव्हा कार (एमएच 15 बीएन 5989) आणि इंडिका व्हिस्टा कार (एमपी 09 सीजे 4667) जप्त केली. नागुडेला 13 सप्टेंबरला मुंबई पोलिस न्यायालयाच्या आदेशाने पुढील तपासासाठी ताब्यात घेतील.