आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनमधील अतिवृष्टी चांगली की वाईट? हवामान खाते जुलै- ऑगस्टच्या तुटीवर ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा जूनमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता दुणावली आहे. १९०० पासूनच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा विचार केल्यास जूनमध्ये जास्त पाऊस झाल्यास ६५ टक्के वेळा पावसाने सरासरीपेक्षा जास्त माप देशाच्या पदरात टाकले आहे. यंदा १८ जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा १० टक्के जास्त पाऊस झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. असे असले तरी यंदा संपूर्ण हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी (८८ टक्के) राहील या मतावर हवामान खाते ठाम आहे. याउलट स्कायमेट व इतर संस्थाच्या मते यंदा १०२ ते १०४ टक्के पाऊस होईल.

हवामान खात्याचा भर अल निनोवर
यंदाचे वर्ष अल निनोचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. आगामी काळात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये ९२ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९० टक्के पावसाची शक्यता आहे. सध्या मादेन-ज्युलियन ऑसिलेसन (हवामानातील विशिष्ट बदल) दिसते आहे. त्यामुळे जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. हा बदल जूनच्या अखेरनंतर संपुष्टात येईल. त्यानंतर पावसाचे
प्रमाण कमी होईल.

स्कायमेट : भरपूर पाऊस
याउलट स्कायमेटने पावसात तूट येण्याची शक्यता नाकारली आहे. स्कायमेटचे उपाध्यक्ष जी.पी. शर्मांंनी सांगितले, यंदा १०२ टक्के पाऊस होईल यावर आम्ही ठाम आहोत. जूनमधील आतापर्यंतचा पाऊस स्कायमेटच्या अपेक्षेप्रमाणे पडला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाची शक्यता कमी
सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडत नसल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. भारतीय उपखंडांत मागील १४० वर्षांचे पर्जन्यमान लक्षात घेतल्यास १९०४ व ०५, १९६५ व ६६ आणि १९८५-८६-८७ अशा चार वेळा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला आहे. यंदा अल निनो असला तरी सरासरीइतका पाऊस होईल.