आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Owasi Today Visiting Aurangjeb\'s Grave Im Khultapad

औरंगजेबाच्या कबर भेटीसाठी ओवेसी आज खुलताबादेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


खुलताबाद - एमआयएमचे आंध्र प्रदेशातील खासदार असदुद्दीन ओवेसी बुधवारी खुलताबादेत येत असून सकाळी 9 च्या सुमारास ते औरंगजेबाच्या कबरीला भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येथील विश्रामगृहात राहण्याची परवानगीही त्यांनी घेतली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी डौले यांनीही दौ-याला पुष्टी दिली. या पार्श्वभूमीवर खुलताबादेत विश्रामगृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी 144 कलमान्वये ओवेसींना शहरात प्रवेशबंदी केली आहे. बंदीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर ओवेसींनी खुलताबादला जाण्यासाठी 12 फेब्रुवारीस विमानतळावर येण्याची व 13 फेब्रुवारीला मुंबईला जाण्याची परवानगी मागितली होती. खंडपीठाने ती नाकारल्यानंतर आता नांदेडहून निघालेले ओवेसी आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरून खुलताबादेत येत आहेत.

आमदार ओवेसींच्या आवाजाचे नमुने घेतले : चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप असलेले आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या आवाजाचे नमुने मंगळवारी न्यायवैद्यक विभागाने घेतले. दरम्यान, ओवेसींच्या कोठडीत 26 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.