आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतापर्यंत 16 हजार 159 तुळशींचे रोपण; उभारले ऑक्सिजन हब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डीबी स्टार आणि गायत्री चेतना केंद्राच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या संजीवनी भेट अभियानात रविवारी 500 तुळशी रोपे लावण्यात आली. विमानतळासमोरील कासलीवाल पूर्वा हाउसिंग सोसायटीमध्ये आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन ही झाडे सोसायटीच्या मोकळ्या जागेत लावली. या सर्वांनी ही रोपे जतन करण्याचा निश्चयही केला. याशिवाय गेल्या आठवडाभरात आकाशवाणी केंद्रासह विविध शाळांमध्येही असंख्य रोपे लावून ऑक्सिजन हब बनवण्यात आला.

 

या अभियानांतर्गत आतापर्यंत 16 हजार 159 तुळशींचे रोपण शहरात विविध ठिकाणी झाले. यात विविध शाळा, महाविद्यालये, हाउसिंग सोसायटी, व्यापारी संकुलासोबतच आकाशवाणीतही तुळस विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

 

रविवार, 26 जून रोजी कासलीवाल सोसायटीत अतिशय चैतन्याचे वातावरण होते. तुळस रोपांची लागवड करण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे एकत्र आले. सकाळच्या कोवळ्या उन्हात या साऱ्यांनी आपल्या सोसायटीच्या मोकळ्या जागेत मानवी साखळी करून झाडांचे रोपण केले. त्यांना लागवडीबाबत गायत्री परिवाराचे राजेश टांक, संजय टांक, प्रकाश पटेल, मुकेश चोटलानी, पुरुषोत्तम पटेल, हेमा टांक आणि ऊर्मिला पटेल यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सोसायटीतील शिवानंदा तुपे, शामा चौधरी, लंका पठाडे, राधिका अकोटकर, सुनीता व्यवहारे, सारिका जैन, रिंकू पळसकर, सपना आनंदे, ममता खंडेलवाल, माधुरी अंभोरे, प्रयाग दांडगे, कविता व्यवहारे, योगिता वडगावकर या महिलांसह कौतिकराव पठाडे, डॉ. पंडित पळसकर, दीपक म्हस्के, ज्ञानदेव वानखेडे, नीलेश खरोटे, रामेश्वर गलांडे, भूषण मोरे, दत्तात्रय गुणाले, कल्याण तुपे, संजय परदेशी, अॅलन डिके, संतोष आनंदे, अतुल अंभोरे, संजय शेळके यांची उपस्थिती होती. या वेळी माजी नगरसेवक संजय चौधरी यांनी एक ट्रॅक्टर खत ही झाडे लावताना दिले.

 

या ठिकाणी झाली लागवड
गेल्या आठवड्यात आकाशवाणी केंद्रातही 500 तुळशी लावण्यात आल्या. तसेच साने गुरुजी फ्लॅट ओनर्स संस्थेत 51 रोपे, वाळूजमधील युरेका इन्फोसिस स्कूलमध्ये 200, एन-2 च्या श्रीराम अपार्टमेंटमध्ये 108, स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये 200 तर, करमाड येथील कै. कमलसिंग नाइक विद्यालयात 400 तुळशी 70 वनौषधींची लागवड करण्यात आली.

 

ऑक्सिजन हबसाठी संपर्क
कॉलनी, कॉलेज, शाळा, संस्थेत तुळशीची बाग किंवा ऑक्सिजन हब तयार करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी बल्क बुकिंगसाठी राजेश टांक 9423448055 यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...