आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ‘फोटोमॅनिया’ या फोटोग्राफीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तीन वेगवेगळय़ा गटांत प्रथम येण्याचा मान रामदास पद्मवार, सुधीर गायकवाड व प्रीती गुंटूरकर यांना मिळाला आहे. या तिघांनीही अनुक्रमे हॅपिनेस, नेचर व अमेझिंग इंडिया या विषयांवर आधारित स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. या राज्यस्तरीय स्पध्रेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
‘भास्कर’च्या वतीने आयोजित या स्पर्धेस राज्य व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका महिन्याच्या कालावधीत दीड लाखाहून अधिक स्पर्धकांनी छायाचित्रे पाठवली. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांनी प्रोफेशनल कॅमेर्याने छायाचित्रे काढण्याची अट नव्हती, अगदी मोबाइल कॅमेर्याने काढलेले छायाचित्रही ग्राह्य धरण्यात येणार होते. त्यामुळे असंख्य हौशी छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. जागतिक पातळीवर नावाजलेले छायाचित्रकार बैजू पाटील यांनी परीक्षण केले.
राष्ट्रीय पुरस्कार लवकरच
फोटोमॅनिया स्पर्धेतील राज्यस्तरीय पुरस्कारांच्या घोषणेनंतर लवकरच राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचीही घोषणा करण्यात येणार आहे. देशातील प्रसिद्ध छायाचित्रकार र्शद्धा कडाकिया, प्रवीण तालान व दैनिक भास्कर समूहाचे नॅशनल एडिटर कल्पेश याग्निक देशपातळीवरील स्पर्धेचे परीक्षक होते. कन्व्हेन्शनल फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेल्या कडाकिया यांची ‘जस्ट क्लिक इमेज मेकिंग’ ही फोटोग्राफी एजन्सी असून यू ट्यूबच्या माध्यमातूनही त्या फोटोग्राफीचे धडे देत असतात. तालान हे नैसर्गिक छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. फॅशन इंडस्ट्रीमधील ख्यातनाम पाच छायाचित्रकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. अँडव्हर्टायझिंग, एडिटोरियल व सेलिब्रिटिज यांच्या कव्हरेजमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
विजेत्यांची नावे
‘फोटोमॅनिया’ स्पर्धेचा शहर पातळीवरील निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला, तर आता राज्यपातळीवरील विजेत्यांची गटनिहाय घोषणा करण्यात आली. ती खालीलप्रमाणे आहे :
आनंद : रामदास पद्मवार (प्रथम), निखिल पाटील (द्वितीय) व संकेत भावसार (तृतीय).
निसर्ग : सुधीर गायकवाड (प्रथम), यतीन गांधी (द्वितीय) व मयूरसिंह राजपूत (तृतीय)
अद्भुत भारत : प्रीती गुंटूरकर (प्रथम), अंकुर साळवी (द्वितीय) व मोहन कुरापती (तृतीय).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.