आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारिया ऑटोचे संचालक राहुल पगारिया यांना मागितली 7 लाख रुपयांची खंडणी, आरोपी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसिद्ध उद्योजक पगारिया अॉटोचे संचालक राहुल पुखराज पगारिया (४२, रा. एन-३, सिडको) यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पत्र लिहून लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी खंडणी मागणारास अटक केली आहे.
 
राहुल पगारिया हे शहरातील बजाज, मारुती, मारुती नेक्सा अशोक लेलँडच्या वाहनांचे सर्वात जुने मोठे वितरक आहेत. त्यांना रिक्षाचालक शेख चाँद शेख अहेमद (३४, रा. गल्ली क्रमांक २, अंबिकानगर, मुकुंदवाडी) याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी दिली. त्याने पगारिया यांच्या अदालत रस्त्यावरील पगारिया टॉवर या कार्यालयात दुपारी साडेचार वाजता सुरक्षा रक्षकाच्या हातात चक्क धमकीचे पत्र दिले. दिवाळीचा दिवस असल्याने हे पत्र थेट पगारिया यांच्या हातात गेले. त्यांना वाटले की दिवाळीच्या शुभेच्छांचे पत्र असावे. पण पत्र फोडून वाचायला हातात घेतले असता त्यात चक्क हिंदीमधील धमकीचा मजकूर निघाला. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तब्बल वीस दिवसांच्या तपासानंतर आरोपीला शोधून काढले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपनिरीक्षक अनिल काचमांडे पुढील तपास करत आहेत.

पोलिसांना कळवू नका म्हणूनही धमकावले
पत्रातील मजकूर हिंदीमध्ये होता. यात पगारिया यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हानी पोहोचवण्यासाठी सात लाख रुपयांची सुपारी घेतली असून ती खंडणी दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच हा प्रकार पोलिसांना कळवण्याचीही धमकी देण्यात आली होती.
 
रिक्षाचालक चांदला चिठ्ठी कोणी दिली?
लिफाफा देणाऱ्या शेख चाँदला अटक केली आहे. चांदनेच लिफाफा पोहोचता केला. परंतु या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता आहे. चांदला चिठ्ठी कोणी दिली, खंडणी मागणारे मुख्य आरोपी कोण आहेत खंडणी मागण्याचे कारण काय? या सर्व अंगाने पोलिस तपास करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...