आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील 3 पिढ्या ‘पैसो का पेड’ च्या ऑडिशन्समध्ये, प्रत्येकाच्या डोळ्यात लाखांचे स्वप्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ९४.३ माय एफएम आणि बुलडाणा अर्बन यांनी आणलेल्या “पैसो का पेड’ च्या ऑडिशन्समध्ये रविवारी प्रोझोन मॉलमध्ये औरंगाबादकरांनी तुफान गर्दी केली. काही स्पर्धकांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मनमुराद हसवले, तर काही स्पर्धकांच्या उत्तराने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 
 
आपल्याला तीन लाख का हवेत ? आणि ते मिळवल्यानंतर आपल्याला खरेच काय करायचे आहे, कोणासाठी करायचे आहे, याचे उत्तर देताना स्पर्धक भावनिक झाले. खूप स्पर्धकांनी आपण मिळालेल्या लाख रुपयांमधून काही रक्कम लष्करासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. या ऑडिशन्समध्ये स्वप्नाचा पाठलाग करणऱ्या तरुणाईचं प्रमाण तर सगळ्यात जास्त होतंच; पण सांसारिक वर्गसुद्धा यात मागे नव्हता. कित्येक स्पर्धकांनी लहान मुलांसह या ठिकाणी हजेरी लावली. सर्वांना आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला, जेव्हा एक आजीबाई ऑडिशनसाठी आल्या. ऑडिशन सुरू असताना त्यांची वर्षाची नातही ऑडिशनमध्ये सहभागी झाली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कुटुंबाच्या तिन्ही पिढ्या ‘पैसोकापेड’च्या ऑडिशनचं आकर्षण ठरल्या. आता यापैकी किती लोकांना ‘पैसो का पेड’मध्ये सहभागी होऊन आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकायला मिळणार हे लवकरच सगळ्यांना कळेल. अधिक जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ९४.३ माय एफएम आणि वाचत राहा दिव्य मराठी. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, लाख जिंकण्याची चौथी पायरी... 
बातम्या आणखी आहेत...