आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paithan Assembly Elections,latest News In Divya Marathi

विकासाच्या मुद्द्यावरून दिशाभूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत सध्या कोण कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतो यावर मतदारांचे लक्ष लागले आहे. आमदार असलेले उमेदवार पुन्हा प्रचारासाठी आपापल्या मतदारसंघात सक्रिय झाले असून पाच वर्षांत काय विकास केला याचा पाढा वाचून दाखवण्यावरच भर देत आहेत, तर विरोधातील उमेदवार विकास खुंटला असल्याचा आरोप करत आपणालाच निवडून देण्याचे जनतेला आवाहन करत आहेत. या दोघांमध्ये मतदान कोणाला करावे यावरून मतदार संभ्रमात पडले आहेत.
पैठण मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार संजय वाघचौरे, गंगापूर- खुलताबादेतून आ. प्रशांत बंब, वैजापूरमधून आर. एम. वाणी, कन्नड- सोयगावमधून आ. हर्षवर्धन जाधव, सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तार, तर फुलंब्री मतदारसंघातून आ. डॉ. कल्याण काळे हे पुन्हा निवडणूक रिंगणात असून शेवटच्या टप्प्यात हे सर्वच आमदार मतदारांसमोर प्रचार फेऱ्या व सभांमधून मतदारसंघासाठी मी किती निधी आणला, कसा विकास केला, या मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत, तर इतर स्पर्धक उमेदवार या आमदार उमेदवारांनी मतदारसंघाची कशी वाट लावली याची इत्थंभूत माहिती मतदारांसमोर प्रचारादरम्यान मांडत आहेत. एकूणच युती व आघाडी तुटल्याने अनेक इच्छुकांना अनपेक्षित उमेदवारीची लॉटरी लागल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवारदेखील संभ्रमात पडले आहेत.

युती, आघाडीअभावी बंडखोरी मोडीत
प्रारंभी युती व आघाडीच्या प्राथमिक स्तरावर बोलण्या सुरू असताना अनेक मतदासंघांतील पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षावर दबाव वाढवण्यासाठी अमुक मतदारसंघ आपल्या पक्षाला सुटावा, अशा मागण्या स्थानिक पातळीवर लावून धरल्या होत्या. अखेर युती- आघाडीच्या बोलण्या फिसकटल्याने प्रत्येक पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करताना दमछाक झाली होती. उमेदवार चांगला आहे, पण जनसंपर्क नाही, जनसंपर्क आहे, पण धनशक्ती लावू शकत नाही. अशा एक ना अनेक बाबींतून अखेर उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले. परिणामी मतदारसंघात प्रमुख पक्षांसह उमेदवारांची संख्या वाढली. मात्र, यंदा सर्वांनाच संधी मिळाल्याने काही ठिकाणी वगळता कुठेही बंडखोरी झाल्याचे दिसून आले नाही.