आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा साठा पश्चिम महाराष्ट्राच्या भरवशावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - यंदा पावसाला सुरुवात झाली असली, तरीही जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्याने विशेष कोणतीच वाढ होत नाही. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातून पाणी येण्यास सुरुवात झाली तरच वाढ होते. अहमदनगर, नाशिक विभागातील धरणे सध्या १० टक्क्यांच्या खालीच असून ती पावसाळ्याच्या शेवटी भरतात. ती भरल्यानंतर जे ओव्हरफ्लोचे पाणी सोडले जाते त्यावर जायकवाडीचा पाणीसाठा अवलंबून आहे.

जलसाठा सलग तिसऱ्या वर्षी मृतसाठ्यावर : जायकवाडीचा मृत पाणीसाठा ७३८ दलघमी आहे. मागील तीन वर्षांपासून उन्हाळ्याच्या शेवटी मृतसाठ्यातून मराठवाड्याची तहान भागवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदा पावसाळा सुरू झाला आहे. सध्या १ टक्का पाणीसाठा असला तरी धरणाच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्यावरच यात पाणी येणे अपेक्षित असते. नसता १५ दिवसांत मृतसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ येणार आहे.

याच दिवशी पाणीसाठा ५.४९ टक्के
गेल्या वर्षी भीषण दुष्काळातही १० जून २०१४ रोजी ५.४९ टक्के पाणीसाठा होता, तर १० जून २०१३ रोजी मृतसाठ्यातून पाणी उपसा होत होता.
दोन वर्षांनंतर साठा ४८ टक्के
मागील दोन वर्षे पाणीसाठा ३६ टक्क्यांवर राहिला. मात्र, २०१४ मध्ये हा ४८ टक्क्यांवर गेला. तो अाज १.८० टक्के झाला आहे.
अाणखी १५ दिवस पाणीसाठा पुरेल
आणखी १५ दिवस हे पाणी पुरेल. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ पाऊस जोरदार झाला नाही तर येण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रापेक्षा वरील भागातून येणाऱ्या पाण्यावर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होते.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे
बातम्या आणखी आहेत...