आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणे भरल्यानंतरही जायकवाडीचे पाणी पळवणे सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगर जिल्ह्यातील धरणे भरूनही मराठवाड्याच्या हक्काचे पाणी वळवण्याचा प्रकार अजूनही थांबलेला नाही. मागील सात दिवसांपासून नांदूर-मधमेश्वरच्या गोदावरी तटकालवा, उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे सात दिवसांत तब्बल अकरा दलघमीपेक्षा आधिक पाणी वळवण्यात आले आहे. औरंगाबादच्या पिण्याचा पाण्याचा हिशेब केल्यास दीड महिन्यापेक्षा अधिकचे पाणी नगरने पळवले आहे.

जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, नगर जिल्ह्यातल्या पुढार्‍यांच्या दादागिरीपुढे प्रशासनासह सारेच हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडीच्या हक्काचे 42 दलघमीपेक्षा जास्त (दीड टीएमसी) पाणी वळवण्यात आले आहे. यात एकट्या नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातील 28 दलघमीपेक्षा जास्त पाण्याचा समावेश आहे.

30 जुलैपासून नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत 11.32 दलघमी पाणी वळवण्यात आले आहे.पाच ऑगस्टला उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स तर डाव्यातून 250 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.तर चार ऑगस्टला डाव्या कालव्यातून 250 आणि उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. 3 ऑगस्टला डाव्या कालव्यातून 250 तर उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दोन ऑगस्टला डाव्या कालव्यातून 350 आणि उजव्या कालव्यातून 275 दलघमी तर 1 ऑगस्टला डाव्या कालव्यातून 320 क्युसेक्स आणि उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. 31 जुलैला डाव्या कालव्यातून 300 क्येसक्स आाणि उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स आणि 30 जुलैला डाव्या कालव्यातून 150 आणि उजव्या कालव्यातून 250 क्युसेक्स पाणी वळवण्यात येत आहे.

जायकवाडीच्या वरच्या भागातल्या धरणात मोठा पाणीसाठा
औरंगाबाद शहराला पिण्याच्या पाण्याचा विचार केल्यास वर्षाकाठी 50 ते 60 दलघमी पाणी लागते. एका दिवसासाठी औरंगाबादला 0.15 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मागील सात दिवसांत 11 दलघमी पेक्षा आधिक पाणी वळवले. त्यामुळे किमान दीड महिन्यापेक्षा अधिक पाणी औरंगाबादला पुरेल एवढे पाणी गेल्या सात दिवसांत वळवले आहे.

जायकवाडीच्या हक्काचे पाणी पावसाळ्यात तरी नगरमध्ये खरिपाला न देता जायकवाडीला दिले पाहिजे. जायकवाडीत 33 टक्के पाणीसाठा होईपर्यंत कालव्यातून पाणी सोडणे शासनाने बंदच केले पाहिजे. नगरमध्ये पाऊस असताना पिकासाठी पाणी सोडण्याची गरज नाही.
-प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

नगरमध्ये पाणी परिषदा घेऊन नगरकर आमदार शंकरराव कोल्हे आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत आहेत. जायकवाडीच्या पाण्यासाठी मराठवाड्याला संघर्ष करावाच लागेल.
-जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष, मराठवाडा मोसंबी उत्पादक शेतकरी संघटना