आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रातील खड्डे, पाणीचोरी शक्य वाटेमध्ये काटे ३१ केटीवेअरचे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोडण्यात येणाऱ्या पाण्याला जायकवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी ३१ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे अडथळे पार करावे लागणार आहेत. नदीपात्रातील खड्डे, पाण्याची होणारी चोरी रोखण्याचेही आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे क्युसेकचे परिमाण मोठे ठेवल्यास वेग वाढून कमी काळात जास्तीत जास्त पाणी पोहोचेल आणि अपव्ययही टळेल, अशी प्रतिक्रिया कडाचे माजी मुख्य अभियंता ए. बी. जोगदंड यांनी व्यक्त केली.

पाणी सोडताना तांत्रिंकदृष्ट्या किती वेगाने जास्तीत जास्त विसर्ग करता येतो त्यावर पाणी येण्याचे प्रमाणही अवलंबून असेल, असे ते म्हणाले.


प्रवरा समूहात भंडारदरा, निळवंडे, आढळा भोजापूर धरणे येतात. यातून सर्वाधिक ६.५ टीएमसी विसर्ग होणार आहे. मात्र या मार्गात १५ केटीवेअर आहेत. मुळा समूहात ४ केटीवेअर व दारणा समूहात १२ केटीवेअर आहेत. भंडारदरातून सोडलेले पाणी निळवंडे धरण भरून जायकवाडीकडे झेपावणार आहे. निळवंडे ते जायकवाडी अंतर १८६ किमी असल्याने जास्तीत जास्त क्युसेक्स पाणी सोडल्यास अपयव्यय टळेल. गंगापूर व दारणाचे पाणी एकाच वेळी सोडले गेले तर प्रवाहाला गती मिळेल. दरम्यान, आॅक्टोबर महिना असल्यामुळे अपव्यय फारसा होणार नाही. तसेच कायद्याचा प्रभावीपणे वापर व्हावा, असे मत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केले आहे.

खड्डे आणि चोरीची भीती
गोदावरी व प्रवरा या नद्यांच्या पात्रात नगर, नाशिक भागात वाळू उपशामुळे खड्डे पडले आहेत. गेल्या वेळी पाणी सोडल्यानंतर १५ ते २० फूटांचे खड्डे पथकाला आढळले होते. त्यामुळे त्यातही पाणी अडणार आहे. शिवाय शेतीपंप किंवा इंजिनाने पाणी खेचणाऱ्या शेतकऱ्यांवरही नजर ठेवावी लागणार आहे.

नियम काय सांगतो
१. पाणी सोडण्याआधी कोल्हापुरी पद्धतीच्या सर्व बंधाऱ्यांची दरवाजे काढून विसर्ग बंद झाल्यानंतरच पुन्हा बसवावेत.
२. पाणी सोडण्याआधी बंधाऱ्यात असलेल्या साठ्याइतकाच साठा नंतर राहील अशाच पद्धतीने हे गेट बसवण्यात यावे.