आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर विकासाचे दावे अन..नगराध्यक्षपदावर दावेदारी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना,भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी स्थानिक नेतेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाल्याने नगर परिषदेची निवडणूक काटे की टक्कर होणार हे स्पष्ट झाले आहे.

पैठण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो याच बाले किल्ल्यात मागच्या टर्मला काँग्रेसचे जितसिंग करकोटक यांनी हादरा देत ११ जागांवर विजय मिळवत काँग्रेसची सत्ता आणली. मात्र त्याच्या वेळी नगराध्यक्ष होण्याच्या वेळीच शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकाला फोडत शिवसेनेच्या ताब्यात पालिका आणली. आता मात्र पुन्हा जितसिंग करकोटक नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार असून काँग्रेसचा शहरातील ते चेहरा असल्याने काँग्रेसची सत्ता पालिकेत आणण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या जवळचे समजले जाणारे जितसिंग करकोटक यांची लढत ही शिवसेनेचे राजू परदेशी यांच्याशी होणार असे पहिल्या टप्प्यात जरी दिसत असले तरी राष्ट्रवादीचे अनिल घोडके यांना माजी आमदार संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात नगर परिषद आली पाहिजे यासाठी मागील दोन महिन्यांपासून कामाला लागाच्या सूचना दिल्या होत्या. शहरात राष्ट्रवादी अनेक राजकीय पक्षातील आजी -माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश करत वातावरण तयार केले असून भाजपने सूरज लोळगे हा नवीन चेहरा नगराध्यक्षपदासाठी उतरवला आहे. ही सर्व नगराध्यक्षपदाची मंडळी पक्षाचे नेते असल्याने बहुमत कोणत्याही पक्षाचे येऊ द्या नगराध्यक्ष मी...झालो पाहिजे वर भर देणार असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत अाहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची भूमिका

जितसिंग करकोटक : काँग्रेस
पैठण शहरासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून कोटीचा निधी आला त्याची वाट लावण्याचे काम पालिकातील सताधाऱ्यांनी केले. आज शहराचा विकास थांबला असून पुन्हा पैठण शहराला महत्त्व प्राप्त करून देणार आहे.

राजू परदेशी शिवसेना
सामान्य नागरिकांसाठी शिवसेनाची सत्ता नगर परिषदेत असली पाहिजे. सर्वाना बरोबर घेऊन आम्ही शहराचा विकास करणार आहोत.

अनिल घोडके : राष्ट्रवादी काँग्रेस
माजी आमदार वाघचौरे यांच्या पुढाकारातून शहरात निधी आला. मात्र त्याचा वापर स्वत:साठी करण्यात आल्याने शहरातील अनेक समस्या ना नागरिक समोर जातात. राष्ट्रवादी ची सत्ता आल्यास मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहोत.

सूरज लोळगे, भाजप
पैठणला धार्मिक ऐतिहासिक वारसा असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. जी कामे झाली ती अर्धवट असून व्यापाऱ्यांचे हाल झाले. सामान्य लोकांचे हाल
होत आहे.
बातम्या आणखी आहेत...