आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैठण नगराध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित; राजकारणी सक्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - येथील नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकारणापासून अलिप्त झालेले ओबीसीमधील दावेदार पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदेच्या नगराध्यक्षांची निवड यावर्षीपासून जनतेतून केली जाणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण आरक्षण सुटण्यापूर्वीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव झाले. त्यामुळे इतर इतर दावेदारांचा भ्रम निराश झाला असून काही मंडळी आता राजकारणातून अलिप्त झाल्याचे दिसते. तर काही मंडळी राजकारणापासून अलिप्त झाले होते ते पुन्हा सक्रिय झाले.
पैठण नगरपरिषदमध्ये बहुमत नसताना शिवसेनेचे दत्ता गोर्डे नगराध्यक्ष झाले तेच पुन्हा नगराध्यक्षपदासाठी दावेदार समजले जात होते. परंतु, त्यांचे काम व लोकप्रियता पाहता ते जनतेतून सहज निवडून येतील, असे बोले जात होते. मात्र नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांच्यासह शिवसेनेचीही कोंडी झाली आहे. आता शिवसेनेकडे जनतेतून निवडूण येईल, असा चेहरा नाही. होते त्यांनीही मागील निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला राम राम ठोकला.
ओबीसीचे नेते पुन्हा शहरात सक्रिय झाल्याने सामान्य शिवसैनिक की पैसेवाले अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीमधील अनेक ओबीसी असलेले नगराध्यक्ष पदासाठी दावे करत आहेत. परंतु जी मंडळी राष्ट्रवादीत नावालाच होती त्यांना पुढे केले जाताना दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये सध्या तरी जितसिंग करकोटक एकमेव दावेदार असून त्यांनाच काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून पुढे केले जाणार आहे. तर भाजपकडून सूरज लोळगे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, राजकीय गोटातून माहिती आहे.
निवडणुकीत ना युती, ना आघाडी होण्याची शक्यता नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असून प्रमुख राजकीय पक्षाकडे एक-दोन दावेदार आहेत. त्यांनी युती, आघाडी केली, तर एका पक्षाला तरी माघार घ्यावी लागेल. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही पक्षाची युती, आघाडी होण्याची शक्यता नाही.

पैठण नगराध्यक्षपदाचे जे सध्या दावेदार समजले जातात त्यांच्याकडे दारूची दुकाने आहेत. या विषयावर तीन वर्षांपूर्वी पैठणमध्ये मोठे आंदोलने झाली होती. परंतु यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे जनतेची आणखी पॉवर वाढली असून दारूवाले नगराध्यक्ष नको अशी चर्चा पैठणमधील सोशल मीडियातून होत आहे. यंदा पहिल्यांदाच नगराध्यक्ष हा जनतेतून निवडल्या जाणार अाहे. त्यामुळ जनतेत लोकप्रिय, दांडगा जनसंपर्क, सामाजिक भान, तातडीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून येणाऱ्या व्यक्तीचे सर्व गुण आणि त्यांची कार्यशैली पारखूनच नगराध्यक्षपदासाठी जनता नक्कीच निवड करतील. त्यामुळे केवळ पैसाच्या जोरावर निवडून येऊ, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांना आता ही एक प्रकारची चपराकच असेल, अशी चर्चा शहरात रंगत आहे.
बातम्या आणखी आहेत...