आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पैठणमध्ये सामूहिक अत्याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातून शिवण क्लाससाठी जाणा-या 15 वर्षीय मुलीचे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता अपहरण करत पैठणला नेऊन तिच्यावर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. चौघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक पैठणला रवाना झाले आहे. अपहरणानंतर 24 तास आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला.


पीडित मुलगी नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली असून, नेहमीप्रमाणे बीड बायपास परिसरात क्लाससाठी जाताना पांढ-या इंडिका कारमधून आलेल्या चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर पैठणला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बुधवारी दुपारी तिला सिडको बसस्थानकावर सोडून देण्यात आले. जखमी अवस्थेत घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सायंकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पीडित मुलीने पोलिसांना आरोपींचे वर्णन सांगितले असून, चौघांपैकी एका आरोपीचे नाव सुमीत आणि दुस-याचे सुनील आहे. इतर दोघांबद्दल माहिती नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, मुलगी 24 तासांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी बुधवारी पोलिसांत दिली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घतले आहे. क्रांती चौक ठाण्याच्या उपनिरीक्षक शुभांगी देशमुख पुढील तपास करत आहेत.


पीडित मुलगी ‘घाटी’त रात्रभर ताटकळत
वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला बुधवारी सायंकाळी पोलिसांनी घाटीत नेले; परंतु स्त्री व प्रसूतीरोग शास्त्राचे डॉक्टरच उपस्थित नसल्याने तिला व पोलिसांना घाटीत रात्र ताटकळत काढावी लागली. गुरुवारी सकाळी डॉक्टर आल्यानंतर या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.