आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी हुंडा घेणार नाही, घेऊ देणार नाही; पैठण शहरातील तरुणांनी घेतली शपथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - आपल्या लग्नासाठी हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये म्हणून एखाद्या तरुणीने आत्महत्या करणे ही लाजिरवाणी गोष्ट असून यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले.
 
लातूर येथील शीतल वायाळ या तरुणीने आपल्या लग्नाच्या हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये, या कारणावरून आत्महत्या केल्याचे तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शीतल वायाळ हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी “हुंडा घेणार नाही, घेऊ देणार नाही’, अशी शपथ शहरातील तरुणांनी घेतली.  
 
जाधव म्हणाले, पुढील काळात कोणत्याही महिलेने आत्महत्या करू नये यासाठी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी व कष्टकरी यांच्या मुला-मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा व मुलांचा शैक्षणिक खर्च राजश्री शाहू महाराज जयंतीदिनी २६  जून रोजी संभाजी ब्रिगेड करणार आहे.
 
प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शीतल वायाळ हिला श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर पठाडे, महेंद्र नरके, प्रमोद कोल्हे, नीलेश वावरे, परमेश्वर बर्डे, निवृत्ती काळे, विकास रोकडे, महेश पवार, भाऊसाहेब भुकेले, संदीप तांबे, अमोल भागवत, गणेश शिंदे, देविदास शिंदे, राजू बोंबले, धनंजय सूर्यवंशी आदी
उपस्थित होते.

महिलांसाठी संभाजी ब्रिगेड निर्भया हेल्पलाइन  
महिलांसाठी मदत म्हणून संभाजी ब्रिगेड निर्भया हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. महिलांच्या संरक्षणासाठी व न्याय्य हक्कासाठी यापुढे शेतकऱ्याचा पुत्र म्हणून संभाजी ब्रिगेड काम करणार असल्याचे या वेळी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...