आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत पाकचा ध्वज जाळला; नकाशावर गोळ्या झाडून हल्ल्याचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी औरंगाबादेत शिवसेनेने तीव्र निदर्शने केली. जोरदार घोषणा देत निदर्शकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला आणि पाकिस्तानच्या नकाशावर रबरी गोळ्या झाडल्या.

मंगळवार आणि बुधवारी पाकिस्तानने जम्मू-काश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची कुरापत काढत हल्ला चढवला. त्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादेतही याचे तीव्र पडसाद उमटले. बुधवारी भाजपच्या वतीने निराला बाजार परिसरात निदर्शने करण्यात आली होती. आज गुरुवारी शिवसेनेच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. क्रांती चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

‘पाकिस्तान हाय हाय’, ‘पाकिस्तानचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देत आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. याशिवाय पाकिस्तानचा मोठा नकाशा आंदोलकांनी तयार करून आणला होता, त्या नकाशावर सैनिकी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी बंदुकांतून रबरी गोळ्या झाडत राग व्यक्त केला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनात आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, शहरप्रमुख विकास जैन, बंडू ओक, त्र्यंबक तुपे, सभागृह नेते सुशील खेडकर, ग् ाटनेते गजानन बारवाल, युवा सेनेचे ऋषिकेश खैरे, विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब दानवे, रमेश इधाटे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत.