आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या काय आहे रमजानमध्ये ‘जकात’चे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इस्लाम धर्मामध्ये नमाज, रोजा, हज हे जसे धार्मिक कर्तव्य दिलेले आहे तसेच जकातही (फर्ज) एक मोठे कर्तव्य आहे. अल्लाहतालाने पवित्र कुराणमध्ये असे सांगितले आहे की, व्याजबट्टय़ाला संपवा आणि दानधर्म जास्त करा. (सूर-ए-बकरा, आयात 276). ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ आणि गरजू लोकांकडे लक्ष द्या. याच कारणामुळे इस्लाम धर्माने जकात अनिवार्य (फर्ज) केली आहे, जेणेकरून गरीब, गरजूंच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. यासंदर्भात मिटमिटा येथील मदरसा अबुबकर सिद्दीकचे (रजि.) व्यवस्थापक मौलाना मोहंमद अन्वारूल हक इशाती यांनी जकातीविषयी अधिक माहिती दिली.

जकात म्हणजे काय

जकात म्हणजे आपली संपत्ती, मालमत्ता पवित्र करणे (बरकत और बढाना) जेव्हा र्शीमंत किंवा चांगली आर्थिक ऐपत असलेली व्यक्ती आपल्या मालमत्तेतून 2.5 टक्के रक्कम गरजू लोकांसाठी देते तेव्हा तिची उर्वरित संपत्ती, मालमत्ता पूर्णपणे पवित्र होते आणि ही संपत्ती कमी होण्याऐवजी वाढत जाते.

जकात देण्यामागचा हेतू

इस्लाम धर्माची अशी मान्यता आहे की, धनदौलत, मालमत्ता ही फक्त एकाच व्यक्ती किंवा गटाकडे नसावी. काही मोजकचे लोक समाजामध्ये र्शीमंतीचे ठेकेदार नसावेत की, ते गोरगरिबांवर हुकूम चालवतील. इस्लाम धर्माचा प्रमुख उद्देश असा की, ही संपत्ती सर्वांना समानपणे मिळावी. यामुळे गरजूंच्या गरजा पूर्ण होतील.

जकातचे सामाजिक फायदे

अल्लाहतालाने श्रीमंत लोकांवर गरिबांचे जे हक्क सांगितले आहेत ते र्शीमंत लोक पूर्ण करत नाहीत. त्यामुळे समाजातील गरिबी संपत नाही. श्रीमंत लोकांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा चाळिसावा भाग जर जकातच्या माध्यमातून गरिबांना दिला तर समाजाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, जे इस्लाम धर्माने र्शीमंतांवर अनिवार्य (फर्ज) केले आहे. रुपया-पैशांचे समाजामध्ये शरीरातील रक्तासारखे महत्त्व आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला रक्ताचा पुरवठा कमी पडला तर प्रकृती बिघडते. त्याचप्रमाणे समाजाच्या एका भागावर गरिबी कोसळली तर पूर्ण समाजात अनैतिक गोष्टी घडतात. म्हणून इस्लाम धर्माने जकातद्वारे विषमतेविरुद्ध मार्ग काढला आहे. व्याज देणे आणि घेणेही पाप मानले आहे.