औरंगाबाद - फुलंब्री तालुक्यातील पाल येथील युवकांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ज्या जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.
गावातील मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून पाल ग्रामस्थांनी २३ फेब्रुवारी २००९ रोजी दलित युवक रोहिदास पंडित तुपे यास विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली होती. न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी २९ सप्टेंबर २०११ रोजी झाली असता न्यायाधीश रमेश कदम यांनी त्या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, बिजूबाई जाधव, रुख्मणबाई जाधव आणि कुसुमबाई जाधव यांनी अॅड. व्ही. डी. सपकाळ आणि अन्य चार जणांनी अॅड. नीलेश घाणेकर, अॅड. जयदीप चटर्जी यांच्यामार्फत औरंगाबाद हायकोर्टात अपील दाखल केले होते.