औरंगाबाद - डोळ्यात अश्रू साठवून गेल्या २२ दिवसांपासून मुलाच्या मृतदेहाची वाट पाहण्याची वेळ पलाशच्या आई-वडील आणि बहिणीवर आली होती. अखेर मंगळवारी (५ एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर पलाशच्या वडिलंानी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा प्रतापनगर स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला पलाश दत्ता बलशेटवार (२१, रा. सुमंगल विहार, गारखेडा) याचा १५ मार्च रोजी इराण येथे शाॅर्टसर्किट होऊन जहाज बुडाल्याने मृत्यू झाला होता. जहाज बुडताना त्याने पाच जणांचे प्राण वाचवले. कॅप्टन जहाजात अडकल्याने तो आत बघण्यासाठी गेला आणि त्याचा मृत्यू झाला. एप्रिल रोजी इराणहून पहाटे पाच वाजता निघालेला पलाशचा मृतदेह मुंबई येथे वाजेच्या सुमारास आणण्यात आला. तेथून जेट एअरवेजच्या विमानाने सायंकाळी वाजेच्या सुमारास मृतदेह औरंगाबाद विमानतळावर आला. पंचनामा झाल्यानंतर रात्री घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. आर्यवैश्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सोशल मीडियावर 'एक माेर्चा मृतदेहासाठी' ही मोहीम राबवण्यात आली. हजारो एसएमएस फोन करून विदेश मंत्रालयाला "कब मिलेगी पलाश की डेड बॉडी' असा प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांना एसएमएस फोन करण्यात आले. या सर्वांची दखल घेत केंद्र राज्य सरकारची यंत्रणा कामाला लागली. प्राचार्या संध्या काळकर पलाशचे वडील दता पलशेटवार यांनी २९ एप्रिल रोजी दिल्लीला जाऊन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेत मृतदेह आणण्यासाठी विनंती केली. खासदार चंद्रकांत खैरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, परभणीचे खासदार बंडू जाधव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे आदी नेत्यांनी मृतदेह आणण्यासाठी सहकार्य केले.
घाटीत पुन्हा एकदा शवविच्छेदन : जहाजाला आग लागल्याने पलाशचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा मोबाइल सुरू असल्याचे दाखवत असून हे कसे शक्य आहे, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. १५ मार्च रोजी पलाशने व्हॉट्सअॅप स्टेटस चेक केल्याचे दिसून आल्यामुळे हा घातपात असावा, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घाटीत पलाशच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक आर. एम. बांगर, अमोल देशमुख, समाजसेवक नारायण कानकटे, ब्रह्मानंद चक्करवार यांची उपस्थिती होती.
२२ दिवसांचा लढा
पलाशचामृतदेह आणण्यासाठी त्याच्या परिवाराला २२ दिवसांचा लढा द्यावा लागला. दहा दिवस इराण सरकारने सुट्या जाहीर केल्यामुळे सरकरी कर्मचारी सुटीवर असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेहासाठी पलाशच्या वडिलांनी पत्रव्यवहार केला. त्यात काही दिवस गेले. यामुळे २२ दिवस वाट पाहावी लागली.