आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणचक्कीच्या नहरीत सहा फुटांपर्यंत पाणी; 90 टक्के सर्वेक्षण पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पावसामुळे पाणचक्कीच्या नहरीत सहा फुटांपर्यंत पाणी आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतिहासतज्ज्ञ डॉ. शेख रमजान यांच्या नेतृत्वात नहरींचे 90 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले. पाऊस पडल्याने ते थांबवण्यात आले होते. 29 जून रोजी सर्वेक्षण पथकातील सदस्य पाणचक्कीच्या नहरींमध्ये उतरले होते तेव्हा त्यात सहा फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याचे आढळून आले.

अत्यंत स्वच्छ असलेल्या या प्रवाहात भरपूर मासेही होते. डॉ. शेख यांनी सांगितले की, नहरींच्या आत माती, कचरा तसेच दगड असल्याने प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नहरींची सफाई होणे गरजेचे आहे. नहरींतील व्हॉल्व्ह यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अभियंत्यांची मदत घ्यावी. म्हणजे पाणचक्कीतून बाराही महिने पाणी मिळू शकेल. सर्वेक्षणाच्या पथकात जुनेद खान, काकासाहेब रणदिवे, राजू शेख, युसूफ अली, शेख अरीफ यांचा समावेश आहे. नहरींमध्ये उतरून पाण्याच्या प्रवाहाचा अनुभव घेण्याचा आनंद काही औरच होता, असे त्यांनी सांगितले.