आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८६ ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील८६ ग्रामपंचायतींसाठी शनिवार, २५ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे १५५० कर्मचाऱ्यांचा ताफा चौथा शनिवार असतानाही कार्यरत राहणार असून शुक्रवारी सायंकाळीच केंद्रांच्या ठिकाणी ईव्हीएम मशीन दाखलही झाल्या आहे. जिल्ह्यातील २९७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातील सहा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध निघालेल्या आहेत. पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीतील ४३ उमेदवार बिनविराेध निवडून आलेले आहेत. उर्वरित ठिकाणी २५ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून तब्बल १५५० कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांच्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था प्रशासनाकडून तयार होती. शनिवारी सकाळी पासून मतदानास सुरुवात होणार असल्याने कर्मचारी सायंकाळीच संबंधित गावात हजर झाले. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष, तीन अधिकारी एक शिपाई, अशी टीम राहणार आहे.

ग्रामपंचायती
बीड - 18
माजलगाव - 03
परळी - 07
वडवणी - 02
अंबाजोगाई - 06
केज - 19
धारूर - 04
आष्टी - 04
पाटोदा - 08
शिरूर - 08
गेवराई - 07

कर्मचारी पाहुणे
२५जुलै रोजी चौथा शनिवार असून कर्मचाऱ्यांना या दिवशी सुटी असते. परंतु निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याने सुटीला त्यांना मुकावे लागणार आहेच, शिवाय प्रशासनाकडून जेवणाचीही व्यवस्था नसल्याने तेथील ग्रामस्थांनाच कर्मचाऱ्यांना ‘पाहुणचार’ करावा लागणार आहे, अशी निवडणुकीची परिस्थिती.

पोलिस सज्ज
निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्रांवर होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिस यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. जालना येथूनही बंदोबस्त मागवण्यात आला असून, तेथील एसआरपीएफची एक तुकडी दाखल झाली.

व्हाॅट्सअॅप बंद
यंदाप्रथमच प्रशासनाकडून व्हाॅट्सअॅपवरून मतदान किती झाले, निघालेले कर्मचारी कुठपर्यंत आले, आदी माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेक कमांडर (स्टेट इलेक्शन कमिशन) अंतर्गत व्हाॅट्सअॅपची सुविधा तयार केली. मात्र, अनेकांकडे ती डाऊनलोड होत नसल्याने ही यंत्रणा बारगळली असल्याची माहिती आहे.