आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandharpur's Digambar Sale, Salunke Died In Accident

पंढरपूरचे दिगंबर साळे, साळुंके यांचे अपघाती निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज / भोपाळ - पंढरपूरचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य दिगंबर अण्णा साळे (55 महावीर चौक, बजाजनगर) यांचे मंगळवारी अपघातात निधन झाले. मध्य प्रदेशातील सागर येथे श्री गुलाबबाबा मठावर ते मित्रासोबत देवदर्शनासाठी जात होते.
भोपाळ-लखनऊ राष्‍ट्रीय महामार्गावर रात्री अडीचच्या सुमारास साळे यांची आर्टिगा गाडी (एमएच 20 सीपी 32) उभ्या कंटेनरवर धडक ली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात साळे व त्यांचे मित्र सर्जेराव अंबादास साळुंके (रा. गोलटगाव, जि.जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक भरत सादरे, दिनेश देशमुख व गणेश बुचुंडे गंभीर जखमी आहेत. जखमींना सागर येथे हलवण्यात आले आहे. साळे यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले.
पंढरपूर, बजाजनगरात बंद
साळे यांच्या निधनाची बातमी कळताच पंढरपूर व बजाजनगरात हळहळ व्यक्त करण्यात आली. व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. नगर महामार्ग, जुन्या रांजणगाव शेणपुंजी मार्गावरील बाजारपेठा बंद होत्या.