आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधकांनी कर्जाचा हिशेब द्यावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांसाठी अालेल्या पीक विम्याच्या एक-एक रुपयाचा िहशेब असून ताे जाहीर अाहे. केवळ अाराेप करून िवराेधक दिशाभूल करत अाहेत त्यांनी त्यांच्याकडील बँकेचे कर्ज, थकबाकी, भ्रष्टाचार प्रकरणांचा िहशेब जनतेसमाेर जाहीरपणे द्यावा. एक- दाेन काेटी कमवण्यासाठी सत्तेत अाले नाही, चांगले कामे निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते अशा स्पष्ट शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विराेधकांवर हल्लाबाेल केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अायाेजित शेतकरी मेळाव्यात त्या बाेलत हाेत्या. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खाेत हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रीतम मुंडे, अामदार अार.टी. देशमुख,भीमराव धाेंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठाेंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पाेकळे, भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष संताेष हंगे उपस्थित हाेते.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर नूतन संचालकांच्या सत्काराचा कार्यक्रम घेणे अपेक्षित हाेते. परंतु हारतुरे टाळून अाम्ही शेतकऱ्यांची बँक पूर्ववत कशी हाेईल याचे नियाेजन करून कामास प्रारंभ केला. या वेळी त्या म्हणाल्या, १९९७ मध्येही जिल्हा बँकअडचणीत सापडली असताना त्यावेळी स्व. गाेपीनाथ मुंडे यांनी ताब्यात घेऊन तिचा नावलाैकिक राज्यभरात केला. ज्यांना सत्तेचा गुलाल लावला त्यांनी राजकीय डावपेच करत बँकेत अध्यक्षपदाचा राजीनामा देत बंॅकेत घाेटाळे झाल्याचे चुकीचे अाराेप केले. बंॅक डबघाईला अाल्याचे चित्र निर्माण केले. यामुळे काही काळ बँकेवर प्रशासकाचा कारभार हाेता. त्यांनी हाेत्या त्याही ठेवी परत करत वेतन अन्य ‌बाबींवर बेसुमार खर्च केला. साहेबांच्या(स्व. मुंडे) स्वप्नातील बंॅकेचे असलेले वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. मुंडे साहेबांच्या काळात ही बँक शेतकऱ्यांची हाेती, अाताही अाहे भविष्यातही बंॅक शेतकऱ्यांसाठी याेजना राबवणार असल्याचे पालकमंत्री म्हणाल्या.

सदाभाऊ खाेत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ही एक टाेळी अाहे. या टाेळीमध्ये ज्यांवर दादागिरी, गुंडगिरी, वादाचे माेठे गुन्हे दाखल अाहेत, ज्यांनी अनेक घाेटाळे केले, ज्यांनी अनेकांना त्रास दिला अशांना या टाेळीत माेठे पद मिळते. चांगले काम करणारे लाेक हे त्यांच्याकडे सतरंजी उचलायला अाहेत, असा अाराेपही खाेत यांनी केला.

गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्यांच्याकडे सत्ता हाेती, त्यांनी जलसंधारणाची कामे करता पैशाचा भ्रष्टाचार केला. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत क्रांतिकारी निर्णय घेऊन विकासाची गंगा सामान्यांच्या हाती देणार अाहे, जनतेने संयम ठेवत ग्रामविकास मंत्री मुडे यांच्या नेतृत्वाला साथ द्यावी, असे अावाहनही सदाभाऊ खाेत यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष अादित्य सारडा यांनी केले.

जिल्हा बँकेच्या शेतकरी मेळाव्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विराेधकांना ठणकावले
पीक विम्यासाठी बँकेत अालेला पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा हाेणार अाहे. एक-एक रुपयाचा हिशेब जाहीर अाहे. परंतु राष्ट्रवादीच्या काही पुढाऱ्यांनी जे अाराेप केले त्यांनी अात्मपरीक्षण करणे गरजेचे अाहे. त्यांनी कर्ज, थकबाकी, अन्य भ्रष्टाचारातील एक-एक रुपयाचा हिशेब जाहीरपणे जनतेला द्यावा, चांगली कामे निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते, असे त्या म्हणाल्या.

कंत्राट घेणे - देणे असे व्यवहार करता थेट निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या पाेषणाचा हक्क त्यांना देऊन दलाली बंद केल्याने अाराेप हाेत अाहेत. चांगली कामे केल्यास माझ्यावर अाराेप हाेत असतील तर ते खंबीरपणे स्वीकारण्यास मी सक्षम अाहे. चांगले निर्णय घेऊन त्यांचे अधिकार, हक्क देण्यासाठीही िहंमत लागते, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ अाणण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना बळकटी देत जलयुक्त िशवार अभियान सुरू केले अाहे. पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांच्या लाखाे हेक्टरवरील शेतीला चांगले दिवस येतील. ग्रामीण जलसमृद्धीसाठी या याेजनेतून सुमारे दीड हजार काेटीची कामे करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या वेळी विस्ताराने सांगितले.

अाचारसंहितेमुळे धनादेश वाटप टाळले
सुरुवातीला पीक विम्याचे वाटप नंतर शेतकरी मेळाव्यात बदल झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अाचारसंहितेमुळे पीक विम्याचे धनादेश वाटप झाले नाही. त्यामुळे नेत्यांच्या हस्ते धनादेश वाटपाच्या हाैसेला सत्ता धाऱ्यांना मुरड घालावी लागली. विम्याची रक्कम खात्यावर जमा हाेणार असल्याचे सांगण्यात अाले.

आरोप राजकीय स्वरूपाचे
चिक्कीप्रकरणात विरोधकांनी केलेले आरोप हे राजकीय स्वरूपाचे आहेत. मी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर माझा आत्मविश्वास आहे. नगर -बीड-परळी रेल्वेला निधी आणण्यासाठीही मी स्पीड दाखवलेली आहे.राज्यात ९० हजार अंगणवाड्या असून त्यात ३० लाख मुले आहेत. त्यामुळे जो काही मी निर्णय घेतला होता. तो जबाबदारीनेच घेतल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड | जलयुक्तशिवाराच्या कामाची मी तांत्रिकदृष्ट्या गुणवत्ता तपासणार असून यात काही काळेबेरे असेल तर अधिकाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येईल.असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मागील वर्षी आजपर्यंत ९९ टक्के पाऊस झाला होता यंदा दहा टक्के पाऊस कमी झाला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जलयुक्त शिवाराचे यश पावसावर अवलंबून आहे. दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. बी-बियाणे आहेत का या व्यवस्थेची तपासणी केली आहे. ३१ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर व्यवस्था करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साडेतीनशे कामे सुरू असून यातील १९४ कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे सध्या प्रलंबित असून सध्या जलयुक्त शिवारातून झालेल्या कामांना पावसाची गरज आहे. जिल्ह्याला राज्यशासनाकडून पीक विम्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्याचे प्रशासन चांगले असल्याची पावती त्यांनी या वेळी दिली. राजकीय दबावाखाली वावरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देतानाच जलयुक्तच्या कामांवर अंकुश ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत,आमदार आर.टी.देशमुख, खासदार डॉ.प्रीतम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, अॅड.लक्ष्मण पवार,माजी आ. केशव आंधळे, रमेश पोकळे आदी उपस्थित होते.

स्वप्न पूर्ण करणार
बीडजिल्ह्याच्या िवकासासाठी दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गाेपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार अाहे. त्यांच्या पुण्याईवरच बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक माझ्याशी जाेडलेला अाहे. तरुणांना राेजगार, शेती, उद्याेग-व्यवसायांची केंद्र, रेल्वे, चाैपदरीकण, दर्जेदार दळणवणासाठी रस्ते तसेच मूलभूत हक्क सुिवधा उपलब्ध करून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण िवकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

कामे दूरदृष्टीनेच
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात शेती शेतीपूरक व्यवसायांना गती िमळण्यासाठी दूरदृष्टीने जलयुक्त शिवार अभियानाचा िनर्णय घेतला अाहे. या निर्णयातून ग्रामीण जीवनमान उंचावणार अाहे. त्यांनी राज्यात लाेकाभिमुख कामे केली. परंतु विराेधकांना ते सहन हाेत नसल्याने अाराेप करत अाहेत. ताईंनीही चाेख उत्तर दिल्याने िवराेधकाचे ताेंड बंद झाले अाहे. सामान्य जनताही पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे अाजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.’’ डाॅ.प्रीतम मुंडे, खासदार