औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची भाजपच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, अशा ठिकाणी भाजपने संपर्कमंत्र्याच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये परभणीमध्ये बबनराव लोणीकर, नांदेडला सुधीर मुनगंटीवार आणि उस्मानाबादला राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्या नियुक्तीमुळे भाजपतल्या एका गटात समाधान व्यक्त केले जात असून या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांना चेकमेट दिला असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वतीने संपर्कमंत्र्यांच्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत. मात्र, औरंगाबादला पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने गेल्या काही दिवसांपासून डावलण्यात येणाऱ्या मुंडे समर्थकांना दिलासा मिळाला आहे.
पुढे वाचा... दुसरे सत्ताकेंद्र