आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांच्या विकासासाठी मुंडेंनी जाहीर केल्या दोन नव्या योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वातंत्र्याच्या६६ वर्षांनंतरही गावांचा विकास झालेला नाही. गावांचा शाश्वत विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासनाने "आपलं गाव आपला विकास' आणि "स्मार्ट ग्राम'या दोन योजना जाहीर करून या दोन्ही योजनांच्या माध्यमातून यापुढे गावांचा विकास होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी स्पष्ट केले.
गुरू लॉन्स बीड बायपास येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय विकास परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी पंकजा पालवे-मुंडे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वित्त ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, प्रभारी प्रधान सचिव व्ही. गिरिराज, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती. मुंडे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी ही विकासाची दोन चाके आहेत. यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास शक्य अाहे. त्यांच्यासाठी विकास परिषदेचे अायोजन करण्यात आले आहे. गावाच्या विकासासाठी नियोजन, स्मार्ट काम आणि अंमलबजावणी केल्यावरच विकास होतो. हाच विकास करण्यासाठी "आमचं गाव आमचा विकास'व "स्मार्ट ग्राम' या दोन योजना अंमलात आणायच्या आहेत. या योजनेत १४ व्या वित्त आयोगासह केंद्र आणि राज्य शासनाकडून गावाला निधी मिळणार आहे. तसेच वसुली ही विकासाचे केंद्रबिंदू असणार आहे.
गावात भौतिक सुविधांसह आर्थिक दुर्बल घटकांसाठी बचत गटांच्या माध्यमातून शासकीय योजना राबवाच्या आहेत. याबरोबर शिक्षण, आरोग्य, आर्थिकस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी थेट सरपंच निवडणूक घेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापुढे ग्रामपंचायतीचे नियमित ऑडिट होणार आहे. विजेची अडचण सोडविण्यासाठी सौर योजनाही राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त ऑनलाइन कामे करण्यात येणार अाहे. विविध सुविधांसह पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते, व्यायामशाळा, मैदान, उद्यान, नाले, गटार, आरोग्य सुविधा, शाळा आणि लोकसहभागातून रस्त्यांच्या बाजूला वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशा विविध शाश्वत विकास योजनांवर अधिकारी, पदाधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष बागडे म्हणाले, जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या चिंतेचा विषय असल्याने शैक्षणिक बळकटीकरण आणि सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. लोणीकर म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी गावे दत्तक घ्यावी,असे आवाहन केले.
राज्यस्तरीय विकास परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे-मुंडे. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, प्रभारी प्रधान सचिव व्ही. गिरिराज आदी. छाया : दिव्य मराठी

पदाधिकाऱ्यांना प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन
याराज्यस्तरीय कार्यशाळेला ३५ राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत प्रभारी प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांनी प्रेझेंटशनद्वारे अधिकाऱ्यांना योजनांची माहिती दिली. शनिवारी प्रशासकीय बाबी, नियोजन, अंमलबजावणी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचारी पाच वर्षांसाठी अपात्र : केसरकर
ग्रामपंचायतीसहस्थानिक स्वराज्य संस्थेत जो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी आढळल्यास त्यावर पाच वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी आणण्यात येणार आहे. ग्रामसडक योजना आवश्यक त्या रस्त्यावरच राबविल्यास चांगले रस्ते होतील. ती जबाबदारी अधिकारी पदाधिकाऱ्यांची असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
दुष्काळासाठी आपणच जबाबदार आहोत
आतापर्यंतजे झाले ते झाले. पण यापुढे करोडोचा निधी आला आणि विकास झाला नाही, हे चालणार नाही. िसंचनांवर करोडो रुपये निधी खर्च होऊन पावसाचे पाणी साठवता आले नाही, त्यामुळे दुष्काळाला आपणच जबाबदार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. सभागृहात सर्वच पक्षाचे लोक आहेत. मी पक्षभेद विकासासाठी बाजूला ठेवला आहे, आपणही विकासावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...