आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम समाजासोबतच राहणार : पंकजा मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर वंजारी समाज पाेरका झाला आहे. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी मुंडे यांना सोडून गेले. आपण मात्र कायम समाजासोबतच राहणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. जय भगवान महासंघातर्फे सिडको वाशी येथे वंजारी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या मेळाव्यात मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत भगवानबाबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित सीडीचे प्रकाशन जय भगवान महासंघाच्या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते विजय नाहटा होते. या वेळी नाहटा, जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भाषणे झाली. सुदाम महाराज पानेगावकर यांची महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच जय भगवान महासंघाच्या उपाध्यक्षपदी सुभाष जावळे, प्रदीप काळे, अतुल मुंडे, सरचिटणीसपदी नामदेव मुंडे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी रामकिसन दहिफळे, बीड धनंजय सानप यांची निवड करण्यात आली.