आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाट समाजाला आरक्षण द्या - पंकजा मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रामध्ये जाट समाजाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाट समाजाच्या आरक्षणासाठी लवकरात लवकर आयोग नेमावा, आयोगामार्फत जाट समाजाचा अहवाल मागवून जाट समाजास इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण द्यावे, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष हाटेसिंग बी. चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, जाट समाजाचा इतर मागासवर्गाच्या यादीत समावेश करावा, असे राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाने महाराष्ट्र सरकारला कळवले होते. एवढेच नाही तर सामाजिक न्यायमंत्री यांना समितीने वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावाही केलेला आहे. मात्र, अद्यापही मागणीचा सकारात्मक विचार झालेला नाही.

महाराष्ट्रात २५० वर्षांपासून जाट समाज वास्तव्यास आहे. शेती आणि मोलमजुरी करूनच समाज आपला उदरनिर्वाह करतो. समाजात आजही अशिक्षितपणा आणि बालविवाहासारखी पद्धत आहे. त्यामुळे इतर समाजाच्या तुलनेत जाट समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे जाट समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अशी मागणी हाटेसिंग चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...