आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास पंकजा मुंडे तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात राहावे की केंद्रात राजकारण करावे, याबाबत मनात गोंधळ सुरू आहे. अनेकांना मी केंद्रात, तर काहींना राज्यात राजकारण करावे, असे वाटते. नुकतीच मी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटणार आहे. त्यानंतर पक्ष देईल ती भूमिका पार पाडणार असल्याचे पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. निवडणूक तोंडावर असल्यामुळे रडत बसायला वेळ नाही. त्यामुळे संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी भूमिका घेणार : सध्या मी कोअर कमिटीमध्ये समाधानी आहे. पाच प्रमुख सदस्यांमध्ये मी आहे. त्यामुळे मला राज्याकडून सन्मान देण्यात आला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीने लोकसभेला मुंडे परिवारापैकी कोणी उभे राहिल्यास उमेदवार देणार नसल्याचे सांगितले. मात्र, बीडमध्ये विधानसभेला सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बहीण राजकारणात आल्यास भार हलका : मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची सर्वात लहान मुलगी राजकारणात येणार, अशी चर्चा सुरू होती. याबाबत विचारले असता आम्ही त्या वेळी दु:खात होतो. त्यामुळे फारसा विचार केला नव्हता. लोकांमध्येच चर्चा होत्या. मात्र, बहीण राजकारणात आल्यास मला मदतच होईल. त्यामुळे माझा भारदेखील हलका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.