आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Said Will Start Sanitary Napkin Scheme Soon

सॅनिटरी नॅपकिन्स योजना लवकरच प्रत्यक्षात आणणार, पंकजांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देण्याच्या योजनेला प्राधान्य देऊ, असे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सांगितले. ‘दिव्य मराठी' कार्यालयात सदिच्छा भेट दिली, त्या वेळी त्या बोलत होत्या.

मुलींसाठी व्हेंडिंग मशीनद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स द्याव्यात, यासाठी ‘दिव्य मराठी’ने गेल्या काही महिन्यांपासून बातम्यांद्वारे पाठपुरावा केला. नुकताच ‘मधुरिमा'चा अंकही या विषयावरच काढण्यात आला. तो पंकजा यांना या वेळी देण्यात आला. दैनिक भास्करने आवाहन करताच राजस्थान सरकाने नॅपकिन देण्यासाठी २० कोटींची तरतूद केली, ही बाबही त्यांच्या लक्षात आणून िदली गेली. त्यावेळी मुख्यमंत्री वसंुधरा राजेंच्या निर्णयाची माहिती आपल्याला आहे. महाराष्ट्रातही सॅनिटरी नॅपकीन देण्याचा मुद्दा आता प्राधान्याचा राहील आणि लवकरच तो प्रत्यक्षात येईल. या खरेदीसाठी ई-टेंडरिंग केले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. चिकी खरेदीतील आरोपांसंदर्भात विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.