आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pankaja Munde Sangharsh Rally In Sillod And Phulambri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता रडायचे नाही, स्वप्नासाठी लढायचे, पंकजा मुंडे यांची जनतेला भावनिक साद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - आतारडणार नाही तर लढून मला बाबांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी िसल्लोड येथे संघर्ष यात्रेदरम्यान सोमवारी केले.
आमदार पालवे यांनी सुरू केलेल्या सिंदखेडराजा ते चाैंढी या संघर्ष यात्रेचे सोमवार,१ रोजी सिल्लोडला आगमन झाले. फर्दापूर (ता. सोयगाव) ते सिल्लोडपर्यंत रॅलीने
आल्यानंतर िसल्लोड येथील महावीर चौकात सभा घेतली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काम मुंडे साहेब करणार होते. त्यांचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी लढायचं, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं, असा मी विचार केला आिण संघर्ष करण्यासाठी बाहेर पडल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आघाडीलाधडा शिकवा : पंकजा
फुलंब्री - सर्वसामान्यशेतकरी नागरिकांचा बळी देणाऱ्या या आघाडी सरकारला कायमचा धडा शिकवण्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कायमचा धडा शिकवून युती सरकारला सत्तेवर आणा मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करा, असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले. वडोदबाजार येथे सोमवारी संघर्ष यात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मला आता गमावण्याची भीती राहिली नाही. मी आता सर्वस्व गमावले आहे. आजही मी जनतेच्या डोळ्यात आदरणीय मुंडे साहेब पाहत आहे. १९९४ मध्ये मुंडे साहेबांनी राज्यात संषर्घ यात्रा काढून काँग्रेस सरकारला घरी पाठवून युतीचे सरकार आणले होते. त्या प्रमाणे या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून या आघाडी सरकारमध्ये बसलेल्या दरोडेखोरांना कायमच हटवायचे आहे. त्यासाठी मदत हवी आहे, असे त्या म्हणाल्या. मुंडे साहेब गरिबांचे कैवारी होते. तो जूनचा दिवस आपल्यासाठी काळा दिवस होऊन आला होता, असेही त्या म्हणाल्या. या वेळी शिवाजी पाथ्रीकर, जे.पी. शेजवळ, सुनील मिरकर आदी उपस्थित होते. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मधुकर म्हस्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला.

वडिलांच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरूच
अजिंठामाझासंघर्ष वडिलांच्या अस्तित्वासाठी असल्याचे प्रतिपादन आमदार पंकजा पालवे यांनी अजिंठा येथे केले. संघर्ष यात्रेनिमित्त पंकजाताई अजिंठा येथे आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी फर्दापूर येथे थांबून अजिंठा लेणी एमटीडीसीच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रभरात या यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचेही पंकजा यांनी सांगितले. श्रीराम मंदिर पंकजाताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आमदार पंकजा मुंडे पावले यांच्या जिल्ह्यात सहा ठिकाणी सभा झाल्या. प्रत्येक सभेत त्यांनी भावनिक आवाहन करत मुंडे साहेबांच्या कार्याला उजाळा दिला राज्यात सत्ता देण्याचे आवाहन केले.

फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज फाट्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आ. पालवे यांना मुंडे यांची प्रतिमा भेट दिली.
कार्यकर्त्यांसोबत घेतले जेवण
सिल्लोडतालुक्यातील आळंदच्या गणपती मंदिर परिसरात िसल्लोड येथील भाजप पदािधकाऱ्यांनी भाजी-पोळीचे जेवण ठेवले होते. त्याचा आ. पंकजा पालवे यांनी अास्वाद घेतला.
‘दिव्य मराठी’ अंक सोबत घेतला
सोमवारच्या‘दिव्य मराठी’त स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे या दोघांच्या संघर्ष यात्रेसंदर्भात बातमी प्रकाशित करण्यात आली होती. ती सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पोहोचल्याचे समजल्यानंतर पालवे यांनी वाचण्यासाठी आळंद येथे ‘दिव्य मराठी’चा अंक मागवून घेतला सोबत ठेवला.