आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pankaja Munde Sangharsha Yatra In Five Days 60 Rallys

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजाच्या संघर्ष यात्रेला तुफान प्रतिसाद, बघा बोलके PHOTOS, पाच दिवसांत घेतल्या 60 सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे- मुंडे यांनी संघर्ष यात्रेत पाच दिवसांत 60 सभा घेतल्या. त्यांच्या पहिल्याच यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांना यात्रेच्या प्रत्येक दिवसाचे रिपोर्टिंग केले जात होते. ‘जेथे स्वागत ठरवले होते, तिथे सभा झाली. जिथे सभेचे नियोजन होते, तिथे महासभा झाली. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला,’ अशी प्रतिक्रिया संघर्ष यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा यांच्या राजकीय कारकीर्दीला नवे वळण देणारी ही यात्रा ठरत आहे. सिंदखेड राजा येथून सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा मंगळवारी पाचव्या दिवशी औरंगाबादेत समारोप झाला. या पाच दिवसांत केवळ महासभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यकर्ते जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून १६ महासभा घेण्यात आल्या.
या संघर्ष यात्रेत ७० जणांची टीम काम करत होती. यामध्ये प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या. तसेच दररोज संध्याकाळी सभा संपल्यानंतर चर्चा व्हायची. यामध्ये त्रुटीवर भर असायचा. तसेच महासभेच्या अगोदर जागेची पाहणी करून त्याचे नियोजन ठरवण्यात यायचे. यामध्ये सोशल मीडियाचा वापरही खुबीने करण्यात आला होता. गोपीनाथ मुंडे यांनी १९९४ मध्ये पंकजा मुंडे यांनी आताच्या संघर्ष यात्रेत भावनेला हात घालत लोकांना जागृत करण्याचे काम केले. पंकजा यांना भेटण्यासाठी लोक गर्दी करत आहेत, अशी माहिती यात्रेचे सहप्रमुख प्रवीण घुगे यांनी दिली.

अभूतपूर्व प्रतिसाद
यात्रेलामिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. राज्याच्या राजकारणात कोणत्याही महिलेने काढलेल्या यात्रेला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. अपेक्षेपेक्षा अनेक पटीने लोकांचा प्रतिसाद मिळाला. सुजितसिंह ठाकूर, संघर्षयात्रा प्रमुख

पुढील स्लाईडवर बघा, पंकजाच्या संघर्ष यात्रेला झालेली तुफान गर्दी... गोपिनाथ मुंडेंच्या स्मृती झाल्या जाग्या...