आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय खंडपीठाकडून अखेर रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामविकासमहिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी बहाल केलेला जळकी बाजारच्या सरपंचांसंबंधीचा निर्णय आैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांनी रद्दबातल ठरवला. सरपंच देवशीलाबाई दांडगे यांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा कसूर केल्याबद्दल विभागीय आयुक्त आैरंगाबाद यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांचे सरपंचपद रद्द केले होते. या आदेशाविरुद्ध सरपंचांनी ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्याकडे अपील दाखल केले होते.

मुंडे यांनी अपील मंजूर करून तत्कालीन ग्रामसेवकावर ठपका ठेवत दांडगेंना सरपंचपद बहाल केले होते. मुंडेंच्या निर्णयास गणेश दांडगे यांनी अॅड. स्वप्निल तावशीकर यांच्यामार्फत आव्हान दिले. त्यांना अॅड. विष्णू पाटील यांनी साहाय्य केले.
बातम्या आणखी आहेत...