आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"देवेंद्र फडणवीसांमध्ये मुंडेंसारखा बाणेदारपणा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माझी जडणघडण मुंडे साहेबांच्या संस्कारातून झाली आहे. त्यामुळे माझ्यात त्यांच्याप्रमाणेच बाणेदारपणा आहे. एवढेच नव्हे, तर माझ्याइतकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही आहे. सरकारला पाठिंबा कोणीही दिला असला तरी विकासकामांत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

त्या गुरुवारी बचत गटाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा िदला. एखादी व्यक्ती मदत करत असेल, तर नाही म्हणणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. यापूर्वीही आवाजी मतदान घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाल्याचे त्या म्हणाल्या.
विश्वासघात नाही...
भाजपने राष्ट्रवादीवर भ्रष्टवादी म्हणत आरोप केले होते. गोपीनाथ मुंडेंनी हयातभर राष्ट्रवादीचा िवरोध केला, त्यामुळे भाजपने जनतेला धोका दिला असे वाटत नाही का, त्यावर पंकजा म्हणाल्या, भाजपने जनतेला धोका दिला नाही. जर भाजपने सत्ता स्थापन केली नसती तर तो जनतेसाठी धोका असता. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात बाल दिनापासून करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.