आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे राजकारणात असणाऱ्या पंकजा मुंडे-धनंजय मुंडे या बहिण-भावाचे नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राजकारणात आणि व्यवसायात माणसे एका ठराविक उंचीवर गेल्यावर दुरावतात, असे म्हणतात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावाच्या नात्याबद्दलही काही प्रमाणात असेच म्हणावे लागेल. पंकजा मुंडे या गेली 8 वर्षे आपला भाऊ आपल्यापासून दुरावल्याची खंत आजही बोलून दाखवतात.
 
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पंकजा मुंडे या रासप नेते महादेव जानकर यांना राखी बांधतात. यावेळी अनेकदा त्यांनी आजच्या दिवशी धनंजय मुंडेची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. मी कधीही धनंजयला त्रास होईल असं वागलेली नाही आणि वागणारही नाही, असे त्या म्हणतात. महादेव जानकर यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. त्यांचे प्रत्येक स्वप्न साकार होवो, अशी सदिच्छा त्या राखी बांधताना व्यक्त करतात. तर आयुष्यभर त्यांच्या पाठिशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहू असे म्हणतात.
 
राजकीय मतभेद कौटुंबिक दु:खापुढे गळून पडले
राजकीय महत्त्वकांक्षेमुळे दुरावलेल्या बहीण-भावातील राजकीय मतभेद कौटुंबिक दु:खापुढे गळून पडल्याचे दिसले होते. पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सांत्वन करण्यासाठी  पंकजा मुंडे या तातडीने धावून गेल्या. दु:खाच्या प्रसंगी बहिणीने भावाला आधार दिला; रक्ताच्या या नात्याचे भावबंध पाहून उपस्थितही गहिवरले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी काही फोटो
बातम्या आणखी आहेत...