आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pansare Murder Case Shiv Sena Support To Sanatan Sanstha

शिवसेनेने केली समीर गायकवाडची पाठराखण; पानसरेंना म्‍हटले धर्मविरोधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात फक्त ‘सनातन’ किंवा इतर हिंदुत्ववादी लोक आहेत याच दिशेने तपास झाला व तपासकर्त्यांना त्या दिशेने जाता यावे असा माहौल निर्माण केला हे पानसरे व दाभोलकरांच्या खर्‍या खुन्यांचे यश मानावे लागेल. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण, पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका. खर्‍या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणार्‍या सुपार्‍या वाजवू नका', अशा शब्‍दांत शिवसेनेने समीर गायकवाडची बाजू घेत या प्रकरणात सनातनला गोवण्‍यात येत असल्‍याची भूमिका पक्षाचे मुखपत्र असलेल्‍या 'सामना'च्‍या अग्रलेखातून घेतली.
नेमके काय म्‍हटले शिवसेनेने
शिवसेनेने 'सामना'च्‍या अग्रलेखातून पोलिस आणि पुरोगामी संघटना यांचा समाचार घेतला. अग्रलेखात म्‍हटले, 'सनातन या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे व अशी मागणी करणारी थोबाडे तीच, तीच आणि तीच आहेत. कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून समीर गायकवाड या तरुणास अटक झाली. गायकवाड हा ‘सनातन’चा साधक आहे. ‘सनातन’च्या अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा व ‘सनातन’वर लगेच बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे व स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे', अशी टीका यातून करण्‍यात आली.
पुढील स्‍लाइडवर वाचा पानसरेंना म्‍हटले, धर्मविरोधी....