आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कामासाठी पानझडेंनी वाढवून दिले ७.५ लाख रुपये!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणतेही विकास काम दर्जा कायम राखत आणि कमीत कमी दरात करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मात्र, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी रस्त्याचे काम ठेकेदार अंदाजपत्रकीय दराने करण्याच्या तयारीत असूनही त्याला साडेसात लाख रुपये जादा देऊ केल्याचा ठपका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेवला आहे. पानझडेंच्या निलंबन अादेशात म्हटले आहे की, व्हाईट टॉपिंग रस्ता कामे जे. पी. इंटरप्रायजेसला दिली होती. त्यातील टीव्ही सेंटर चौक ते जळगाव जंक्शन रोडचे एक कोटी रुपयांचे काम सर्वसाधारण सभा, स्थायी समितीला अंधारात ठेवून आर. के. इंटरप्रायजेसला दिले. निविदा काढता फक्त दरपत्रक मागवून मंजुरीसाठी सादर केले. आर. के. अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार असताना ७.५ टक्के जादा रक्कम देऊन मनपाचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान केेले. विशिष्ट ठेकेदाच्या लाभासाठी हा प्रकार केल्याने पानझडेंची सचोटी कर्तव्य परायणता संशयास्पद दिसून आली. त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या पोटनियम चा भंग केला. त्यांनी नोटिसी खुलासाही समाधानकारक केला नाही. निलंबन काळात त्यांना आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय औरंगाबाद मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.
हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या प्रकरणात पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, के. एम. फालक यांनाही नोटिस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात कारवाई झालेली नाही. गाळ काढण्यासाठी पानझडेंनी अंदाजपत्रकाची तपासणी करता दरसूची वापरली. अत्यल्प खपाच्या दैनिकांमध्ये जाहिरात देऊन हे काम विशिष्ट ठेकेदाराला मिळावे, असे प्रयत्न केले. गरज नसताना निविदेत उच्च दर्जाच्या ठेकेदाराची अट टाकली. मार्च २००३ च्या शासन निर्णयानुसार एक कोटीं रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कामासाठी तटस्थ तांत्रिक लेखापरीक्षण आवश्यक असतानाही थेट बिल अदा करण्यासाठी सादर करण्यात आले.

२४ कोटींचा फैसला बाकी
२४कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदेतही पानझडेंमुळे कोटी ६७ लाख रुपयांचा भुर्दंड पडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या विषयी अंतिम निर्णयासाठी अजून बैठक झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...