आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटीप्रकरणी सागर जळगाव पोलिसांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तंत्रनिकेतन पेपरफुटी प्रकरणात पकडलेला सागर बावत यास न्यायालयाने जामीन देताच जळगावच्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जळगावच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
12 नोव्हेंबरला बेसिक मॅथच्या पेपरचे फोटो काढून ते मोबाइलच्या माध्यमातून इतरांना पाठवल्याची फिर्याद जळगावच्या तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास बोंडे यांनी दिली होती. या फिर्यादीवरून सागरला जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करणार आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या अँप्लाइड मॅथ या विषयाची प्रत पोलिसांनी सागरकडून जप्त केली आहे. तो आठ दिवस औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात होता.
औरंगाबादमध्ये मात्र पोलिसांचा तपास पुढे जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत एकही गठ्ठा गायब नाही, असे तंत्रशिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता प्रश्नपत्रिकेचे तीन गठ्ठे गायब असल्याचे कळते. तंत्रशिक्षण मंडळाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या हाती कुठलाच ठोस पुरावा लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्यापही अंधारात आहे.