आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या नऊ कारखान्यांत पेपर रिसायकलिंग यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उद्योग क्षेत्राला सहकार्य करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून त्याला उद्योजकांनी मदत करावी. औरंगाबादेत 9 पेपर मिल्स आहेत. त्या चांगल्या प्रकारे सुरू असून या कारखान्यांमध्ये पेपर रिसायकलिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे, असे प्रशंसोद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी गुरुवारी काढले.

इंडियन पल्प अ‍ॅड पेपर टेक्निकल असोसिएशनच्या दोनदिवसीय विभागीय परिषदेस गुरुवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी पांढरीपांडे बोलत होते. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजयसिंग, बल्लारपूर पेपर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निहार अग्रवाल, शेखर देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवसेंदिवस कागदाचा वापर वाढत असून त्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची कमतरता सातत्याने भासत आहे. वापरण्यात आलेल्या कागदांचे रिसायकलिंग करून चांगल्या प्रतीचा कागद कशा प्रकारे निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न व्हावा.

या प्रक्रियेत विजेचा वापर कमी कसा होईल, या प्रमुख मुद्दय़ांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. पेपर मिल्स व कच्चा माल पुरवणार्‍या कंपन्यांचे 110 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमासाठी अक्षय राठी, हेमंत कुंटे, शेखर देसरडा, आकाश कागलीवाल, सत्यनारायण अग्रवाल, महेश बेडसे, प्रकाश राठी, बी. डी. वर्मा पर्शिम घेत आहेत.