आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरचा मुख्य पाइपलाइनचा दावा फोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरालामुबलक पाणी देण्यासाठी समांतरचे कंत्राट देण्यात आलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडून जुलैअखेरीस जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या मुख्य पाइपलाइनचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र, जुलै संपला तरी खरेदी करणाऱ्या पाइपची तपासणीच करण्यात आली नसल्याने कंपनीने केलेला दावा फोल ठरला आहे. दुसऱ्यांदा हा दावा फोल ठरला असून कंपनी योजनेच्या भवितव्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांकडूनही शंका घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

कंपनीला पालकमंत्री रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्याकडून डेडलाइन देण्यात आल्यानंतर सर्वसाधारण सभा आणि खा. चंद्रकांत खैरे यांनी पंधरा दिवसांत कंपनीला मुख्य पाइपलाइनचे काम करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा कंपनीने जुलैअखेरीस काम सुरू होणार असल्याचा दावा केला होता. मुख्य पाइपलाइनबरोबर जायकवाडी जलाशयात पाणी उपसा करण्यासाठी जास्त क्षमतेचे नवीन पंपहाऊस तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार होता. मात्र ही दोन्ही कामे अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. तसेच हे काम कधी सुरू करण्यात येईल याबाबतही कंपनीच्या अधिकाऱ्यांना निश्चित माहिती देता आली नाही. त्यामुळे या योजना कंपनीबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

दोन वर्षांत पाणी कसे मिळणार?
यायोजनेला आता प्रारंभ झाल्यास दोन वर्षांत पाणी मिळण्याची काही प्रमाणात आशा होती. मात्र, अद्यापही सर्वेक्षण आणि तपासणीच्या कामालाच प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत पाणी मिळेल किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अद्याप पाइपची तपासणीच नाही
मुख्यपाइपलाइन टाकण्यासाठी दोन हजार मिमीचे माइल स्टील पाइप खरेदी करण्यात येणार आहेत. खरेदीपूर्वी या पाइपची तपासणी समांतर मनपाने नेमलेल्या सल्लागार समितीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतरच ही खरेदी करण्यात येणार आहे.

3 समांतरच्या भवितव्याबाबत साशंकता
2 जुलैअखेरीस होणार होते काम सुरू
1 जुलै संपून गेला तरी पाइपची तपासणीच नाही

अंतिम टप्प्यात काम
जायकवाडीतीलकाम सुरू करण्यासाठी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन पाइप खरेदीपूर्वी सल्लागार समितीकडून तपासणी करूनच खरेदी करणार आहे. अद्याप तपासणी झालेली नाही. अर्णबघोष, प्रकल्प संचालक