आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांच्या भूमिकेकडे भाजपचे लागले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबााद - समांतर जलवाहिनीबाबत विशेष सर्वसाधारण सभेसाठी प्रशासनाने प्रस्ताव महापौरांकडे दिला असला तरी आता त्यावर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. प्रस्तावात आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका काय मांडली आहे याकडे भाजप लक्ष ठेवून आहे तर शिवसेना मुंबईत होणाऱ्या बैठकीची वाट पाहत आहे.
मे महिन्याच्या अखेरीपासून होणार होणार अशी चर्चा असलेली समांतरचा फैसला करणारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी परवा महापौर त्र्यंबक तुपे यांना पत्र प्रस्ताव दिला. प्रस्ताव सध्या बंद पाकिटात असून त्यात प्रशासनाचे समांतरच्या नोटिसीला उत्तर त्यावरील टिपण असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत राजकीय हालचाली काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता भाजपने सावध भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. आयुक्तांनी समांतरबाबत स्पष्ट भूमिका घेतली असेल तर उत्तमच आहे. आम्ही लोकांसोबतच राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सांगितले. भाजपवर श्रेष्ठींकडून याबाबत कोणताही दबाव नाही, असेही ते म्हणाले. समांतर ही योजना ज्या उद्योगसमूहाची आहे त्या एस्सेलचे अध्यक्ष सुभाषचंद्र गोयल हे आता भाजपचे खासदार झाले असल्याने त्याचा काही परिणाम होईल का यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

तिकडे शिवसेना मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे डोळे लावून बसली आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत यावर निर्णय घेऊ, असे सांगितल्याने आता याबाबतचे सारे बाड घेऊन सेनेचे नेते मंुबईत जाणार अाहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात ही बैठक होईल. याबाबत शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य म्हणाले की, बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. निर्णय, निष्कर्ष काहीही असो नागरिकांना पाणी मिळणार आहे की नाही हे पक्षासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...