आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर’च्या निकालासाठी तारखेची प्रतीक्षा, अमृत योजनेअंतर्गत मान्यता विचाराधीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या महिन्यात मनपाने समांतर जलवाहिनी योजनेचा करार रद्द करण्याबाबत दिलेल्या नोटिसीला सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेल्या १८ पानी उत्तराचा अभ्यास करून मनपाने आपला निर्णय पक्का केला आहे. मात्र, न्यायालयाचा अवमान होऊ नये यासाठी आॅगस्टच्या सुनावणीनंतर मनपा निर्णय जाहीर करणार आहे.
३० जून रोजी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेने एकमताने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तशी नोटीसही कंपनीला बजावली होती. मनपाच्या या नोटिसीला निर्धारित ३० दिवसांच्या आत कंपनीने १८ पानी उत्तर सादर केले. काल सकाळी कंपनीचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी ते उत्तर कायदेशीर तांत्रिक बाबींच्या तपासणीसाठी विधी विभाग तांत्रिक विभागांकडे पाठवले. या दोन्ही विभागांनी मंगळवार बुधवारी या उत्तराचा अभ्यास करून आपला अहवाल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे सादर केला.

याबाबत आयुक्तांनी सांगितले की, मनपाने आपला निर्णय घेतला आहे, पण न्यायालयीन वादामुळे तो आताच जाहीर करणे योग्य होणार नाही. सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेत बँक गॅरंटी जप्त करू नये मनपाने एकतर्फी कारवाई करू नये, असा आदेश मिळवला होता.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी असून समांतर जलवाहिनीला अमृत योजनेअंतर्गत मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. या संदर्भात आमदार विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
बातम्या आणखी आहेत...