आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parallel Scheme Probe In Aurangabad Municipal Corporation

समांतर योजनेची चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्याआठ वर्षांपासून फक्त चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनी योजनेची आणि त्यातील मीटर जोडणीची सचवि दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२३ जुलै) विधान परिषदेत केली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. समांतरची योजना म्हणजे "गले मे अटकी हुई हड्डी है' अशी टिप्पणी त्यांनी केली.

२००६ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेली समांतरची योजना अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. त्यातच गेल्या महिन्यात १५३ कोटी रुपये बचतीच्या नावाखाली डीआयऐवजी एचडीपीई पाइप वापरण्याची परवानगी देणारा प्रस्ताव इतविृत्तात घुसडून मंजूर करण्यात आला. या साऱ्याच मुद्द्यांवर आमदार सुभाष झांबड, सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत झांबड यांनी सांगितले की, कंपनीला १५३ कोटींचा फायदा करून देण्यासाठी मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी डीआयऐवजी निकृष्ट दर्जाचे एचडीपीई पाइप खरेदीचा कुटिल डाव रचला होता. हे अधिकारी कोण, हे जनतेसमोर आले पाहिजे. प्रारंभी ३५९ कोटींची योजना आता १०१८ कोटींची कशी झाली, असा सवालही त्यांनी केला. चव्हाण म्हणाले की, बाजारात दीड हजार रुपयांत मिळणारे मीटर नागरिकांना हजार ६२१ रुपये खर्चून समांतरच्या ठेकेदाराकडूनच खरेदीची सक्ती केली जात आहे. आमदारद्वयाच्या प्रश्नावर राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उत्तर दिले. त्यावर चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली.

बारकोड घोटाळ्यावर तारांकित प्रश्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या बारकोड उत्तरपत्रिका घोटाळ्यासंदर्भात गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी नविेदन करायचे आहे. ७३ लाख ५२ हजार रुपयांच्या या अर्थिक घोटाळ्यासंदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि परीक्षा विभागाचे उपकुलसचवि पी. एम. नेटके यांना शुक्रवारी सकाळी आठ वाजता तावडेंच्या बंगल्यावर बोलावले आहे. त्यासाठी ते रवाना झाले.

एका स्थानिक पुढाऱ्याचे स्वारस्य
समांतरच्यामीटर योजनेत एका स्थानिक पुढाऱ्याचे स्वारस्य आहे. त्याच्या मुलाला हाताशी धरून ८०० रुपयांचे मीटर ३५०० रुपयांत दिले जात असल्याचा आरोप झांबड यांनी केला. मात्र, पुढाऱ्याचे नाव जाहीर केले नाही.