आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parallel Water Project Issue At Aurangabad, Divya Marathi

औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी अडून राहिल्याने समांतरचे घोडे थबकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जलवाहिनीचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी अडून राहिल्याप्रकल्पाची 200 कोटी रुपयांची वाढीव किंमत आम्ही देऊ शकत नाही या एकाच विषयावर महानगरपालिका आणि समांतरने समांतरचे गाडे एक इंचही पुढे सरकले नाही. गुरुवारी झालेल्या तासाभराच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी आपापली ठाम भूमिका मांडल्यानंतर अखेर हा तिढा सोडवण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय झाला. आजच्या चर्चेत मनपाने सरकारकडून ठेकेदार कंपनीला वाढीवर रक्कम मिळवून देण्यात मदत करण्याची तयारी दश्रवत समांतरची धुगधुगी कायम ठेवली आहे.

2011 पासून तिढा बनलेली समांतर जलवाहिनी योजना मार्चमध्ये एकदाची मंजूर झाली. आता 792 कोटी रुपयांच्या या योजनेचे काम सुरू करण्याची वेळ आली तर ठेकेदार औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने आता प्रकल्पाची किंमत किमान 200 कोटींनी वाढल्याने मनपाने ती वाढीव रक्कम द्यावी अशी मागणी करीत पुढच्या हालचाली सुरू केलेल्या नाहीत. 200 कोटी रुपयांची रक्कम देण्याची मनपाची तयारी नाही. जनतेच्या माथी एक रुपयाचाही भुर्दंड पडू देणार नाही अशी भूमिका मनपाने घेतली. त्याला मनपाची नाजूक तिजोरी हेही एक कारण आहेच. दुसरीकडे, ठेकेदाराने 200 कोटी रुपये आपण भरणार नाही असे सांगत हात वर केले. मागील महिन्यात ठेकेदार आणि मनपात बैठक झाल्यानंतर चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले व त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यावर महापौर कला ओझा यांच्या दालनात ठेकेदार कंपनीचे संचालक अशोक अग्रवाल व इतर अधिकारी आणि मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महापौर, उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे यांच्यात ही बैठक झाली. त्यात वाढीव किमतीचा तिढा हाच प्रमुख विषय होता. आम्हाला हे काम करायचे आहे, पण वाढीव किंमत आम्ही भरू शकत नाही असे सांगत कंपनीने मनपाकडे यावर विचार करण्यासाठी आणखी दोन महिने वेळ मागितला. प्रकल्पावरून आणखी काही वाद होऊ नयेत यासाठी यावर मार्ग निघणे गरजेचे असल्याचे कंपनीने सांगितले. तसेच कंपनीने प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचा वापर न केल्यास 15 ऑगस्टनंतर बँकेकडून विचारणा होईल व नव्या अडचणी तयार होतील असेही कंपनीने सांगितले.
पाणीपट्टी वसुलीची मागणी फेटाळली
महापौर कला ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, योजनेचे काम सुरूकरण्याची कंपनीची तयारी आहे. त्यांना मदत करण्यास आम्ही तयार आहोत. कंपनीने निर्धारित 25 वर्षांच्या मुदतीत आणखी दोन वर्षे वाढ करून पाणीपट्टी वसूली करू देण्याची मागणी केली. ती मनपाने फेटाळल्याचे महापौरांनी सांगितले.

दहा दिवसांचा कालावधी
तासभर याच विषयाभोवती चर्चा फिरत राहिल्यानंतर अखेर हा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व मनपाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी व बीओटीचे तज्ज्ञ यांची एक समिती नेमून त्यांच्यामार्फत सन्मान्य तोडगा काढण्याचे ठरवण्यात आले. या प्रक्रियेला दहा दिवसांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे.

आम्ही भार उचलणार नाही
मनपा आयुक्त डॉ. कांबळे व महापौर कला ओझा यांनी प्रकल्पाला झालेल्या विलंबाला मनपा जबाबदार नसल्याने आम्ही एक रुपयाचाही भार उचलणार नाही असे स्पष्ट केले. कंपनीने ही रक्कम कशी उभारायची ते ठरवावे असे मनपाने ठणकावले. जर यात राज्यसरकारची मदत घ्यायची असेल, तर कंपनीने पुढाकार घ्यावा मनपा त्यांना सहकार्य करेल, अशी ग्वाही देण्यात आली.