आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समांतर’बाबत प्रशासनाने परस्पर ठरवलेली बैठक पदाधिकारी टाळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेतप्रशासन विरुद्ध पदाधिकारी संघर्ष प्रत्येक टप्प्यावर सुरू झाला आहे. समांतरचा करार रद्द करण्याची अंतिम टर्मिनेशन नोटीस देण्याआधीच्या आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहण्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. आम्ही सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला आहे, आता प्रशासनाने पुढील कार्यवाही करायला हवी, अशी भूमिका घेतली आहे.
३० जून रोजी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने समांतरचा करार रद्द करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला पुढील कार्यवाहीचे अधिकार प्रशासनाचे प्र्रमुख म्हणून आयुक्तांना दिले. त्यानंतर मनपाने कंपनीला नोटीस पाठवली. ३० दिवसांनी कंपनीने आपली बाजू मांडणारे पत्रही मनपाकडे सोपवले. आता करार रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी उद्या आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महापौरांच्या दालनात बैठक बोलावली. त्यासाठी महापौरांसह सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले. विशेष म्हणजे महापौरांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीबाबतचे पत्र महापौरांच्या कार्यालयातून जाता चक्क कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी पाठवले.
बैठकीला आपल्यासह कोणताही पदाधिकारी हजर राहणार नसल्याचे महापौर तुपे म्हणाले. प्रशासनाच्या या भूमिकेबाबतचा संताप ते लपवू शकले नाहीत. ते म्हणाले, ‘या बैठकीची माहिती मिळताच मी आयुक्तांना पत्र पाठवले. आम्ही सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय घेतला आहे. पुढचे अधिकार आयुक्तांना दिले असताना पदाधिकाऱ्यांसोबत वेगळी बैठक घेण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. आम्ही या बैठकीला हजर राहणार नाहीत.’ उपमहापौर राठोड म्हणाले, एक तर अशी बैठक बोलावण्याचे औचित्य दिसत नाही. शिवाय ज्या मनपाच्या नोटीस कंपनीच्या उत्तराचा विषय देण्यात आला आहे त्यांच्या प्रतीही आम्हाला देण्यात आल्या नाहीत. बैठकीला हजर राहिलो तरी कागदपत्रे अभ्यासता बोलणार कसे? म्हणजे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला साक्षीदार एवढेच आमचे काम असणार आहे. आम्ही सर्वसाधारण सभेत जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी आता प्रशासनाने करायला हवी, असे मतही त्यांनी मांडले.
शहरातीलखड्डे बुजवण्यासाठी लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. यापेक्षा अधिक वाईट आणि लज्जास्पद काय आहे, असा उद्विग्न सवाल करीत महापौरांनी उद्याची साप्ताहिक आढावा बैठकच रद्द केली आहे.
महापौरांनी मागच्या दोन महिन्यांपासून साप्ताहिक आढावा बैठक घेण्याचा पायंडा पाडला होता. त्यात सूचना देत कामे पटापट मार्गी लावता येतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. उलट मागच्या बैठकीतील समस्या तशाच, त्यात नवीन कामांची भर असा डोंगर वाढत चालला. त्यामुळे उद्या होणारी साप्ताहिक आढावा बैठकच महापौरांनी रद्द केली आहे.

‘दिव्य मराठी’शी बोलताना महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले की, बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते प्रशासन गांभीर्याने घेत नाही. तीन महिन्यांपूर्वी खड्डे बुजवण्याचा निर्णय झाला होता. अर्धा पावसाळा संपला, पण मनपा मुरूम टाकू शकलेली नाही. लोकांनी खड्डे बुजवायला सुरुवात केली ही लाज आणणारी गोष्ट आहे. त्यामुळे बैठका घेऊन काही होणार नाही अशा मतापर्यंत मी आलो आहे. उद्याची बैठकही त्यामुळेच रद्द केली आहे, असे देखिल महापौर म्हणाले.

{ नवीन ४४ रस्त्यांच्या कामांसाठी पीएमसी नेमण्यावरही आजतागायत निर्णय झालेला नाही.
{ होर्डिंगमधून ते १० कोटींचे उत्पन्न व्हावे यासाठी निर्णय घेतला, पण त्याचीही दखल मनपाने घेतली नाही.
{मालमत्ता कर निर्धारणाचे खासगीकरण करण्याबाबत सर्वसाधारण सभेने जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी नाही.
{ कंत्राटी कर्मचारी घेण्याचा ठराव मंजूर केला. त्याचाही निर्णय झाला नाही.
{कचरा वाहून नेण्यासाठी ५० रिक्षा खरेदी करण्यासाठी पैसा आला, पण अजून निविदा आजपर्यंत मार्गी लागली नाही.
{ जेटिंग मशीनच्या खरेदीचेही घोडे असेच रखडलेले आहे. काहीच हालचाल नाही.
बातम्या आणखी आहेत...