आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्थाचालकांनी आदेश धुडकावला, तक्रार निवारण अधिकारी नेमण्याची १० ऑगस्टची मुदत संपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालक शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या वादावादीवर तोडगा काढत शासनाने शाळास्तरावर १० ऑगस्टपर्यंत तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचे आदेश बजावले. मात्र, बहुतांश शाळांनी मनुष्यबळ कमतरतेच्या नावाखाली तो आदेश धुडकावून लावला. यामुळे संस्थाचालकांविरुद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
पालक संस्थाचालकांमध्ये विविध कारणावरून वादावादी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. प्रत्येक पालक थेट शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करीत असे. त्या तक्रारीकडे मुदतीत लक्ष दिल्यास अनेक पालक थेट न्यायालयात जात होते. परिणामी, शिक्षण विभागास धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी न्यायालयात चकरा माराव्या लागत तक्रारींच्या संख्येत वाढ होत होती. याबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेत जिल्हास्तरावर प्रत्येक शाळेतच तक्रार निवारण अधिकारी नेमून तक्रारी निकाली काढण्याचे आदेश २६ जुलै रोजी पत्र काढून बजावले. त्या निर्णयानुसार प्रत्येक शाळेत १० ऑगस्टपर्यंत तक्रार निवारण अधिकारी नेमून त्याचे नाव दर्शनी भागावर फलक लावण्यास सांगितले होते. शिक्षण आयुक्तांच्या सूचनेनुसार शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी २६ जुलैला सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश जारी केले.

काय होते आदेशात?
राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांबद्दल येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यात याव्यात. तक्रार निवारण अधिकारी म्हणून मुख्याध्यापकांनीच जबाबदारी सांभाळावी. शिवाय शाळेत दर्शनी भागावर मोठा फलक लावून त्यावर तक्रार अधिकाऱ्याचे नाव शंभर फुटांवरून दिसेल, अशा अक्षरात लावणे बंधनकारक आहे.

आम्ही प्रयत्नशील आहोत
^शासनाचा निर्णय चांगला आहे, आम्ही त्याचे पालनही करत आहोत. मात्र, दंडात्मक कारवाईचा इशारा देत असल्यानेच आम्ही तो लागू करणार नाही. सौजन्याने वागवा. आम्ही प्रयत्न करू. -एस. पी. जवळकर, संस्थाचालक

अत्यल्प प्रतिसाद
^शिक्षणा धिकाऱ्यांनी सर्वच शाळांना तक्रार निवारण अधिकारी नेमून वाद तेथेच मिटविण्यास सांगितले. बहुतांश शाळांनी तशा हालचाली केल्याही आहेत. ज्या शाळा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाऊ शकतो. -भाऊसाहेब तुपे, प्रभारी शिक्षण उपसंचालक
बातम्या आणखी आहेत...