आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेश शिरसाट यांना परिवर्तन नाट्य गौरव पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परिवर्तनसंस्थे तर्फे देण्यात येणारा ‘परिवर्तन नाट्य गौरव पुरस्कार’ रंगभूमी, चित्रपट, मालिकांत लक्षवेधी कामगिरी करणारे औरंगाबाद येथील कलावंत योगेश शिरसाठ यांना ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ. दिलीप घारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘सूर रंगदर्शन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. त्याची संकल्पना लक्ष्मीकांत धोंड यांची असून पंडित विश्वनाथ ओक यांचे संगीत लाभले आहे. यात विश्वनाथ दाशरथे, राजश्री ओक, श्रद्धा जोशी, डॉ. जयश्री गोडसे आदींचा सहभाग राहणार आहे. संगीत साथ शांतीभूषण चारठाणकर सुजित नेवपूरकर, रंगभूषा नेपथ्य- रवी कुलकर्णी, प्रकाश योजना- वसंत दातार, ध्वनी व्यवस्था- अविनाश थिगळे यांची असणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद देण्याचे आवाहन परिवर्तनचे डॉ. सुनील देशपांडे, प्रा. मोहन फुले, डॉ. ज्योती उमेश दाशरथी यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...