आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमध्ये पर्जन्ययागास प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा. सुख-शांती नांदावी, यासाठी घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्रीसंत जनार्दन स्वामी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने संत जनार्दनस्वामी संकल्पित समाधी मंदिरात पर्जन्य यागास मंगळवारपासून सुरुवात झाली. सुरुवातीला बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवास येळगंगा नदी व शिवसरोवर जलाने अभिषेक करण्यात आला. या वेळी शांतिगिरी महाराज यांची विशेष उपस्थिती होती.
१३ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या पर्जन्ययागाचा प्रारंभ जनार्दन स्वामींची भव्य पालखी मिरवणूक काढून करण्यात आला. या वेळी मिरवणुकीत ढोल-ताशांसह डोक्यावर कलशधारी महिला व युवतींचा समावेश होता. त्यानंतर जनार्दन स्वामी मंिदर व घृष्णेश्वर मंिदरात ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी जलाभिषेकासाठी दयानंद फुलारे पाटील यांना, तर यज्ञाकरिता लक्ष्मण मिसाळ यांना मुख्य यजमानपद देण्यात आले. जलाभिषेकाचे पौराेहित्य दीपकगुरू शुक्ला, तर यज्ञाचे पौराेहित्य सुयशगुरू िशवपुरी हे करत आहेत.
या वेळी घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य, कार्यकारी विश्वस्त राजेंद्र कौशिके, समस्त ब्रह्मवृंद, विष्णू महाराज, संदीप नरोटे, जेजुरकर नाना, आदिनाथ काळे, जनार्दन शिंदे, गणेश बोडके, रूपचंद शेळके, योगेश टोपरे, मुख्य पुजारी रवी पुराणिक यांच्यासह वेरूळ पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.