आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नो पार्किंग’ नावापुरतेच जिकडे तिकडे वाहनेच वाहने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर नो पार्किगचा बोर्ड लावण्यात आला आहे, तरीही नागरिक बिनधास्तपणे नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावत आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला वाहनधारकांनी आव्हान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदारकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना सोबत येणार्‍या कार्यकर्त्याची वाहने गेटच्या बाहेर लावावी, यासाठी एक सहायक पोलिस निरीक्षक, एक कॉन्स्टेबल आणि दोन हवालदार तैनात केले होते. कालावधी संपल्यानंतर तेथे एका झाडाला नो पार्किंगचा बोर्ड लावण्यात आला, तरीदेखील येथे वाहने लावली जातात. याकडे लक्ष ठेवण्याची गरज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासनाला वाटत नाही. या मार्गावरून ये-जा करणार्‍या सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना विचारले असता याबाबत वाहतूक पोलिसांना पत्र दिले जाईल, असे सांगण्यात आले.