आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी देण्यासाठी कडा विभागाचे कागदी खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीटंचाईमुळे जुलै २०१५ पासून परळीचे औष्णिक विद्युत केंद्र बंद आहे. मात्र, जायकवाडीत पाणीसाठा वाढल्यामुळे या केंद्राला पाणी देण्याची मागणी परळीत ऑगस्ट रोजीच करण्यात आली होती. मात्र, पाणी सोडण्याचा निर्णय तर सोडाच प्रस्तावच मिळाला नसल्याचा दावा कडाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे यांनी केला आहे, तर आपण ऑगस्टलाच प्रस्ताव पाठवल्याचा दावा केंद्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात ११३० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. यामध्ये २५० मेगावॅटचे आणि २१० मेगावॅटच्या दोन संचांद्वारे वीज निर्मिती केली जाते. प्रदूषणामुळे एक संच बंद ठेवण्यात आला, तर पाण्याअभावी गेल्या वर्षभरापासून वीज निर्मितीच बंद आहे. माजलगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्यामुळे परळी केंद्रासाठी पाणी देण्याची स्थिती नाही. त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी ऑगस्ट रोजीच कडा विभागाकडे करण्यात आली आहे.

याबाबत औष्णिक विद्युत केंद्राचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले की जायकवाडी धरणात ३५ टक्के पाणीसाठा असतानाच ऑगस्ट रोजीच कडा विभागाला पाण्याच्या मागणीचे पत्र पाठवले आहे. त्याच वेळी त्वरित दलघमी पाणी सोडण्याची मागणी केली होती. आता जायकवाडीत पाणीसाठा ६६ टक्के असल्याने पाणी सोडणे आवश्यक असतानाही निर्णयच होत नाही. परळी केंद्रासाठी खडका बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या बंधाऱ्यातही पाणीसाठा नाही.

प्रस्ताव मिळाला नाही : दरम्यान,याबाबत कडाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे यांना विचारले असता याबाबतचा कोणताही प्रस्ताव अजून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अजून कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

पाणी असूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा
मराठवाड्यात तब्बल वीस दिवस पावसाचा खंड पडला आह. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मात्र, जायकवाडीतून पाणी सोडल्यास पावणेदोन लाख शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र, पाणी असूनही केवळ कालवा समितीच्या बैठकांअभावी शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याचीही वाट पाहावी लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...