आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Nomination , Latest News, Divya Marathi

औरंगाबाद लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून शनिवारी शहागंज येथील गांधी भवनात माजी खासदार उत्तमसिंह पवार व माजी आमदार नितीन पाटील यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. हाणामारीत रहीम उमर पटेल (31, हर्सूल) जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उमेदवार चाचपणीसाठी आलेल्या दोन पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुक उमेदवार पवार आणि पाटील यांचे समर्थक समोरासमोर आले. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. निरीक्षकांच्या उपस्थितीत सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. दोन्ही बाजूंनी अर्धा तास घोषणाबाजी सुरू होती. मुजफ्फर हुसेन बोलण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर गोंधळ सुरू झाला. या वेळी झालेल्या हाणामारीत पवार यांचा एक समर्थक रक्तबंबाळ झाल्याचे सर्वांनी पाहिले. याप्रकरणी कोणीही तक्रार दिलेली नाही. तक्रार आल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे सिटी चौक पोलिसांनी सांगितले.